Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार

Mahayuti: महापालिका निवडणुका जाहीर होताच ठाण्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. महायुतीमधला प्रमुख पक्ष फुटणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath ShindeSaam Tv
Published On

Summary -

  • महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय हालचालींना वेग

  • राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा इशारा दिला

  • ४०० हून अधिक उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडे आले आहेत

  • राष्ट्रवादीची १३१ जागांवर स्वतंत्र लढण्याची तयारी आहे

  • महायुतीत मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता

विकास काटे, ठाणे

आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीमधून योग्य तो मानसन्मान न मिळाल्यास ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेत महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने राष्ट्रवादीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. योग्य तो मानसन्मान न मिळाल्यास आम्ही स्वबळावर निवडणुकींना सामोरे जाऊ. ४०० पेक्षाही आमच्याकडे अधिक उमेदवारीचे फॉर्म आलेले आहेत. त्यामुळे १३१ जागा आम्ही स्वबळावर लढू असा इशारा महायुतीमधील राष्ट्रवादी पक्षाने दिला आहे.

ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितले की, '२०१७ च्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन नंबरचा पक्ष होता. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. ४०० पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आमच्याकडे आलेले आहेत. प्रत्येक विभागात पॅनल उभा करण्याची आमची तयारी झालेली आहे. अद्याप पक्षाने आम्हाला काही निर्देश दिलेले नाहीत. महायुतीमध्ये जर आमच्या पक्षाचा चांगला मानसन्मान होणार असेल तर आम्ही त्याबाबत विचार करू. आम्ही दोन महिन्या आधीच स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे.'

Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार
Maharashtra Politics: निवडणुका जाहीर होताच शरद पवार गटाला भाजपचा दे धक्का; बड्या महिला नेत्यानं सोडली साथ

त्यांनी पुढे सांगितले की, 'याआधी महापालिकेत आमच्या ३८ जागा होत्या त्या आम्ही मागणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या कामकाजात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे एक नंबरवर आहे. आमची नागरिकांच्या समोर जाण्याची पूर्ण तयारी आहे. भाजपासोबत जाण्याचा आमचा विचार अद्याप नाही आहे आणि नसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विचारात घेतल्याशिवाय ठाण्याचा महापौर बसणार नाही एवढा ठाम विश्वास आम्हाला आहे. तरुणांना संधी यंदा दिली जाणार आहे. १०० टक्केनवीन फळी आम्ही उभी करणार आहोत.'

Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार
Maharashtra Politics: राज्यातील पालिका निवडणुकीनंतर शिवसेनेत भाकरी फिरणार? या मंत्र्यांना एकनाथ शिंदे देणार डच्चू|VIDEO

तसंच, 'प्रचाराचा नारळ फोडणार त्या दिवशी ठाणे शहरात नवीन घडामोड आपल्याला बघायला मिळेल. काही अवधी उरलेला आहे पण धमाका होणार... होणार आणि होणारच. बंडखोरीपेक्षा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आमचा नारा आहे. घरी बसून मी निवडून येईल म्हणून युतीच्या मागे मी जाणार नाही. कार्यकर्त्याला जिवंत ठेवणे हे पक्षाची प्रथम जबाबदारी आहे.', असे नजीब मुल्ला म्हणाले.

Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार
Maharashtra Politics: निवडणुकीचे बिगुल वाजताच अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com