Maharashtra Politics: राज्यातील पालिका निवडणुकीनंतर शिवसेनेत भाकरी फिरणार? या मंत्र्यांना एकनाथ शिंदे देणार डच्चू|VIDEO

Maharashtra Municipal Election: महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीमध्ये मंत्र्यांची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.

राज्यात होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र या निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरत्याच मर्यादित न राहता शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी लिटमस टेस्ट ठरणार असल्याचं चित्र आहे. शिवसेनेतील सध्याचे मंत्री आणि पक्षपदाधिकारी यांची कामगिरी या निवडणुकांतून थेट जनतेच्या कसोटीवर लागणार आहे. जिथे यश, तिथे संधी आणि अपयश, तिथे बदल अशी स्पष्ट भूमिका पक्ष नेतृत्वाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पालिका निवडणुकांनंतर शिवसेनेत अंतर्गत संघटनात्मक निवडणुका घेतल्या जाणार असून पक्षांतर्गत मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. काही मंत्र्यांकडे पक्षाची जबाबदारी सोपवली जाणार असून तर काही नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगराध्यक्ष निवडणुकांमधील यश-अपयश हेच पुढील निर्णयांचं मोजमाप ठरणार आहे. त्यामुळे अनेक विद्यमान मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे.

खरंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असे सूचक वक्तव्य केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता या निवडणुकांनंतर मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेत फेरबदल होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आता प्रश्न एकच कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार? आणि कोणाला पक्षातील महत्वाच्या पदांची जबाबदारी मिळणार? पालिका निवडणुकांचे निकालच यावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com