मुंबईसह ५ महापालिकेत ठाकरे बंधूंची युती, २ दिवसात घोषणा, उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने सगळं सांगितलं, वाचा सविस्तर

Sanjay Raut Confirms Uddhav–Raj Thackeray Electoral Understanding: संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Sanjay Raut Confirms Uddhav–Raj Thackeray Electoral Understanding
Sanjay Raut Confirms Uddhav–Raj Thackeray Electoral UnderstandingSaam
Published On

पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे कधी युतीची घोषणा करणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, मीरा - भाईंदर, तसेच पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहोत', अशी माहिती संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत दिली. 'काल मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर अंगात उत्साह संचारलाय. ट्रीटमेंट चालूच राहिल. परिस्थिती कोणतीही असो, आता मुंबई वाचवण्यासाठी उतरायला हवे', असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut Confirms Uddhav–Raj Thackeray Electoral Understanding
निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संजय राऊत म्हणाले, 'उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. या क्षणी मराठी माणसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसाठी एकत्र आले आहेत', असं संजय राऊत म्हणाले.

'बाकी ठिकाणी स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. मात्र, २९ महापालिकांपेक्षा ही मुख्य लढाई मुंबईची आहे. आम्ही मराठी माणसे आमची मुंबई अमित शहा यांच्या घशात जाऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुख्य लढाई मुंबईचीच होती. या राज्याला रहमान डकैत नेमका कोण आहे? हे ठाऊक आहे. कुणाला मुंबई विकायची आहे. या लोकांना पाठबळ देणारे कोण आहेत? हे संपूर्ण मु्ंबईला माहितीय', असा घणाघातही राऊतांनी केला.

Sanjay Raut Confirms Uddhav–Raj Thackeray Electoral Understanding
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता म्हाडा भाड्यानेही घरे देणार; पोर्टल कधी सुरू होणार?

ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार?

येत्या आठवड्यात युतीची घोषणा व्हायला हरकत नाही. आता प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या क्षणी काँग्रेस आमच्यासोबत आहेत, असं मला दिसतंय. बिहार निवडणुकीनंतर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढलाय. त्यांनी मुंबईच्या लढाईत असायला हवे होते, अशी आमची भूमिका आहे. आम्ही वरिष्ठांशीही बोललो. पण त्यांनी ही बाब स्थानिक पातळीवर सोडली आहे', असं संजय राऊत म्हणाले.

'स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचे आवाहन आहे, तुम्ही चूल मांडली तर भाजपला याची मदत होईल. अशा प्रकारच्या भूमिका मुंबईच्या लढाईत घेऊ नये. जनता ही बाब विसरणार नाही. भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येणार आहेत. हे लक्षात घ्या', असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com