बदलापूर निवडणुकीत तब्बल १२ दाम्पत्य उमेदवारीत
शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जण रिंगणात
भाजप आणि शिंदे गटाने अनुभवी व कुटुंबीय उमेदवारांना प्राधान्य
बदलापूरमध्ये नात्यागोत्यांच्या राजकारणाची चर्चा जोरात
मयुरेश कडाव - बदलापूर
बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी दिग्गजांनी कंबर कसलीय. मात्र या निवडणुकीत पुन्हा एकदा नात्यागोत्याचं राजकारण पाहायला मिळतंय. तब्बल 12 दाम्पत्य निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर यात एकाच कुटुंबातील 6 जण निवडणूक लढवणार असल्याचं दिसतंय.
निवडणूक आणि नात्या गोत्याचं राजकारण तसं नाही, कुठे पती-पत्नी तर कुठे पिता-पुत्र, कुठे दीर-भावजय तर कुठे भाऊ-भाऊ असं चित्र पाहायला मिळतं. बदलापूर नगरपालिका निवडणुकीत तब्बल 12 दाम्पत्य मैदानात उतरले आहेत. महत्वाचं म्हणजे ही 11 जोडपी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांमधली आहेत. त्यातही शिवसेना शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी देण्यात आलीय.
भाजपकडून गटनेते राजेंद्र घोरपडे आणि नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी रूचिता घोरपडे, भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी उर्मिला संभाजी शिंदे, शहराध्यक्ष रमेश सोळशे आणि हर्षदा सोळसे, माजी शहराध्यक्ष शरद तेली आणि कविता तेली, सुरज मुठे-संध्या मुठे, सागर घोरपडे-निशा घोरपडे अशा 6 दांपत्याना उमेदवारी देण्यात आलीय. तर शिवसेना शिंदे गटाकडून शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि विणा म्हात्रे त्यांचे भाऊ तुकाराम म्हात्रे आणि त्यांची पत्नी उषा म्हात्रे, प्रवीण राऊत-शीतल राऊत, श्रीधर पाटील-स्वप्ना पाटील, जयश्री भोईर - मुकुंद भोईर यांना उमेदवारी मिळालीय. याशिवाय वामन म्हात्रे यांचे पुत्र वरूण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे हे देखील उमेदवार आहेत. तर रासपकडून रुपेश थोरात आणि सुषमा थोरात मैदानात आहेत.
बदलापूरत शहरात नात्या-गोत्यांच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर शिवेसेना-भाजपच्या नेत्यांनी मात्र आधीचा अनुभव, प्रभागात केलेलं काम आणि निवडून येण्याची क्षमता या आधारावरच उमेदवारी दिली जात असल्याचं सांगत पती-पत्नी आणि नात्या-गोत्याच्या राजकारणाचं समर्थन केलंय.
महत्वाचं म्हणजे संभाव्य उमेदवारांच्या यादीतील जवळपास 90 टक्के उमेदवारांनी याआधी नगरसेवक म्हणून काम केलंय. बदलापूरच्या राजकारणात आतापर्यंत म्हात्रे, घोरपडे, राऊत, पाटील कुटुंबियांचाच वरचष्मा राहिलाय. त्यामुळे याहीवेळी संभाव्य उमेदवारांनी बाजी मारली तर पालिकेच्या सभागृहात 12 जोडपी आणि एकाच कुटुंबातील 6 जण शहराचा गाडा हाकताना पाहायला मिळतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.