सचिन जाधव
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका उद्योजकाला प्राण गमवावे लागल्याची घटना घडली आहे. या घटनेवरून भटक्या कुत्र्यांविरोधात लोकांकडून संताप पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, भटक्या कुत्र्यांना खाद्य का देते, असा सवाल करत महिला पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)
पुण्यात एका महिलेने भटक्या कुत्र्यांना खाद्य दिल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना डीएसके विश्व येथील चंद्रमा सोसायटीत घडली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी मोहिनी पैठणकर कुलकर्णी यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मोहिनी पैठणकर-कुलकर्णी यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर लोकांमध्ये वर्तन चांगलं नसल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
भटक्या कुत्र्यांचा खाद्यासाठी भटकंती करत असताना अपघात होतात. या अपघातात निष्पाप कुत्र्यांचा जीव जातो. या मुक्या प्राण्यांना खाद्य पुरविण्याचं काम मनिषा पवार या अनेक वर्षांपासून करतात.
पुण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याने मनिषा पवार यांनी भटक्या कुत्र्यांसाठी आणलेले खाद्यही फेकून दिलं. या घटनेनंतर माजी मंत्री मनेका गांधी यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली.
तसेच मनिषा पवार यांनी पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार केली. या प्रकरणी त्यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पैठणकर-कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.