

सचिन गाड
Mumbai News: मुंबईत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील वडाळ्यात एका ४ वर्षीय मुलीवर एका व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरु केली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. वडाळ्यात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे . ४० वर्षीय व्यक्तीने ओळखीचा फायदा घेत घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
४ वर्षीय मुलगी घरात एकटीच खेळत होती. चिमुरडी घरी एकटी असल्याचं बघून आरोपीने संधी साधली. त्याने घरात घुसून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. अत्याचार केल्याचं चिमुरडीच्या आईला माहीत होताच घटनास्थळी पोहोचली. पीडितेच्या आईने आरोपीला बेदम चोप दिला.
आरोपीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीच्या विरोधात आर ए के मार्ग पोलीस ठाण्यात अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बदलापुरातही धक्कादायक घटना घडली. बदलापुरातील पश्चिम भागात ही घटना घडली आहे. एका क्लिनिकमध्ये डॉक्टरकडून २५ वर्षीय गतीमंद तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४० वर्षीय डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गतीमंद तरुणीच्या आईने तिला किराणा दुकानातून मसाले आणण्यासाठी पाठविले होते. या तरुणीला मसाला विक्रेता दुकानदार चांगल्याप्रकारे ओळखतो. यावेळी याच परिसरातील डॉक्टरने तिला एकटी पाहून क्लिनिकमध्ये बोलावलं. त्यानंतर डॉक्टरने तिच्यावर क्लिनिकमध्येच अत्याचार केला. या घटनेने परिसरातच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.