Mumbai Crime News: ऑनलाईन दारू मागवणं पडलं महागात; सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ५० हजारांचा गंडा

Mumbai Crime News: मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरात राहणाऱ्या व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या ४३ वर्षीय महिलेला सायबर ठगाने जवळपास पन्नास हजार रुपयांचा गंडा घातला.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News: मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरात राहणाऱ्या व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या ४३ वर्षीय महिलेला सायबर ठगाने जवळपास पन्नास हजार रुपयांचा गंडा घातला. महिलेने अवघ्या ९७५ रुपयांची ऑनलाईन वाईन ऑर्डर केली. मात्र, सायबर ठगाने त्यांना गंडवत खात्यातून ४९ हजार ९५७ काढून घेतले.

याप्रकरणी महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. यानुसार वांद्रे पोलिसांनी आयपीसी कायद्याच्या कलम ४१९ आणि ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67(सी) आणि 66(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime News
Pradeep Kurulkar News: प्रदीप कुरुलकरांकडून दोन महिलांवर अत्याचार; दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिमेला रहात असलेल्या मेघना (नाव बदलले आहे) या ४३ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता महिलेने ऑनलाईन पद्धतीने वाईन मागवण्यासाठी वांद्रे येथील पॅरी वाईन्स शॉपचा पर्याय निवडला.

या महिलेला गुगलवर पॅरी वाईन्स शॉप ऑनलाइन बुकिंगसाठी एक नंबर मिळाला. ७ जुलै रोजी महिलेने वाईनची ऑर्डर देण्यासाठी त्या नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्तीने फोन उचलून आपण त्रिपाठी बोलत असल्याचे सांगितले.

महिलेने ऑनलाईन दारू खरेदीबाबत विचारला असता, व्यक्तीने पत्ता आणि ब्रँड विचारला. यानंतर महिलेने वाईनची ऑर्डर केली. फसवणूक करणाऱ्याने महिलेला वाईनचे बिल पाठवून ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले.

Mumbai Crime News
Chhagan Bhujbal News: मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक; पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती समोर

आरोपीने महिलेला ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितले. सुरूवातीला महिलेच्या खात्यातून १९,९९१ रुपये डेबिट झाले. पण फसवणूक करणाऱ्यानेच महिलेला हे पैसे चूकुन डेबिट झाल्याचं सांगितलं. तुम्ही काळजी करू नका, पैसे परत मिळतील, असा विश्वासही त्याने महिलेला दिला.

अशाप्रकारे आणखी दोन वेळा महिलेच्या खात्यातून १९,९९१ असे करून एकूण ४९ हजार ९५७ रुपये डेबिट झाले. सतत पैसे डेबिट होत असल्याचं कळताच महिलेने पुन्हा त्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने तातडीने वांद्रे पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com