police arrested 7 women for playing cards
police arrested 7 women for playing cardssaam tv

Police Raid: सात महिलांना जुगार खेळताना पकडले; गुन्हा दाखल

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Published on

उल्हासनगर : सर्वसाधारणपणे जुगार केवळ पुरूषच खेळतात असा समज आहे. परंतु चक्क महिला जुगार खेळताना उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली आहे. एका घरात टाकलेल्या छाप्यात महिला जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत सात महिलांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. (police arrested 7 women for playing cards in ulhasnagar)

उल्हासनगर (ulhasnagar) मध्यवर्ती पोलीस (police) ठाण्याच्या हद्दीत २० सेक्शन परिसरात एका घरात हा तीन पत्ती जुगार खेळविला जात होता. याची गुप्त माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला.

police arrested 7 women for playing cards
Poonam Pandey: पाॅर्न फिल्म प्रकरणात पूनम पांडेला सर्वाेच्च न्यायालयात मिळाला दिलासा

या छाप्यात सात महिलांना (women) जुगार खेळताना पाेलिसांनी रंगेहाथ पकडले. तसेच जुगारात लावलेले पैसेही पोलिसांनी जप्त केले. आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर करत आहे.

edited by : siddharth latkar

police arrested 7 women for playing cards
Nagar Panchayat Election 2022 Result: सेना की राष्ट्रवादी? साता-यात उत्सुकता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com