पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरातील फेलिसिटी सोसायटी समोर झालेल्या हिट अँड रनची घटना घडली होती. या अपघाताला ७२ तास उलटून गेल्या नतंरही आरोपी कार चालक अजूनही पोलीसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे एकूणच पिंपरी चिंचवड शहर पोलीसांच्या कार्य पद्धतीवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात हजारो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा काहीच फायदा नसल्याचे दिसत आहे. हिट अँड रन अपघात केल्यानंतर आरोपी पळ काढत असताना त्याचा कारचा व्हेकअल नंबर आणि कार चालक हे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद व्हायला हवे होते. मात्र, एवढी सगळी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असताना देखील पोलिसांना कार व्हेइअल नंबर आणि कार ड्रायव्हर विषयी कोणताही महिती हाती लागली नाही आहे.
सोहम पटेल हा 38 वर्षाचा तरुण दिवाळीच्या रात्री आपल्या कुटुंबियांसोबत रस्त्याच्या कडेला फटाके फोडत असताना एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने त्याला जोरदार धडक देऊन उडवलं आहे. रावेत येथील फेलिसिटी सोसायटी समोर सोहम पटेल हा 38 वर्षाच्या तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके उडवीत असताना एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने त्याला चिरडून पळ काढला आहे. (Pimpri Chinchwad Hit And Run Case)
या हिट अँड रन अपघातामध्ये सोहम पटेल या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अतिशय दुर्देवी अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. दिवाळीच्या दिवशी पटेल कुटुंबीयवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात होऊन जवळपास 72 तास झाल्यानंतरही या अपघातातील आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलं नसल्याने रावेत परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रावेत पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला तात्काळ अटक करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा रावेत परिसरातील नागरिकांनी दिला आहे. (Ravet Hit And Run Case)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.