Amol kolhe Fake Call: भाजपच्या उमेदवाराची चालबाजी! विरोधीपक्षातील खासदाराच्या नावाने फेक कॉल अन्...

Amol kolhe Fake Call : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पिंपरी-चिंचवडमधील भाजप उमेदवाराने गोलमाल केल्याची घटना समोर आलीय. काय आहे हा प्रकार ते जाणून घेऊ.
Amol kolhe Fake Call
Amol kolhe Fake Call
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या उमेदवाराचा गोलमाल कारभार समोरला आलाय. उमेदवाराने आपला प्रचार करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्याच्या नावाचा वापर केलाय. विरोधी पक्षातील खासदाराच्या नावाने फेक कॉल करत थेट आपल्यासाठी मतं मागितली आहेत. हा प्रकार पुण्यात घडला असून उमेदवाराच्या चालबाजीमुळे मतदार बुचकळ्यात पडलेत. चालबाजी करणारा उमेदवार भाजपचा असून हा प्रकार पुण्यातील पिंपरी-चिंचवड मतदार संघात घडलाय.

Amol kolhe Fake Call
Devendra Fadnavis: अजित पवार गटाचे उमेदवार एबी फॉर्म मागे घेतील, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आशा

विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांकडून प्रचार सुरू झालाय. जात आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवार करत असतात. यासाठी विविध मार्गाने आपला प्रचार करत असतात. डिजिटल प्लॅटफॉर्म, पत्रकं , प्रचार सभा, रॅली, फेसबूक पोस्ट, आदीच्या मार्गाने उमेदवार आपला प्रचार करतात. यात अजून एक प्रकार म्हणजे रेकॉर्डिग केलेला फोन कॉल करून मतदारांकडून मत मागतात. मात्र यातून उमेदवार चालबाजी करत असल्याचं समोर आलंय. पिंपरी चिंचवड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराने चालबाजी केल्याचं समोर आलंय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आलीय.

Amol kolhe Fake Call
Pandharpur Politics: आखणी एका घरात फूट पडणार? दोन भावांमध्ये वाढणार राजकीय वैर?

शंकर जगताप यांनी मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. विरोधी पक्षातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने फेक कॉल करत मतदारांना आपल्या नावाची मते द्यावीत अशी विनंती केली. भाजपच्या उमेदवारासाठी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाचा फोन कॉल येत असल्याने मतदार बुचकळ्यात पडले.

याप्रकरणा संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, शंकर जगताप हे आपला प्रचार करत आहेत. मतदार संघातील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी फोन कॉलचा उपयोग करत ते मतं मागत आहेत. मात्र यात त्यांनी चालबाजी करत विरोधी पक्षाच्या खासदार म्हणजेच अमोल कोल्हे यांचे नाव वापरलं. मतदारांना त्यांच्या मोबाईलवर अमोल कोल्हेंचं नाव ट्रू कॉलरला दिसत होतं. फोन आल्यानंतर शंकर जगताप यांना मतदान करा, असा संदेश दिला जात होता.

अमोल कोल्हेकडून भाजपचा प्रचार केला जातोय असं मतदारांना भासवलं जात आहे. हा सर्व चालबाजीचा प्रकार शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल कलाटे यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून रोहन जाधव यांनी याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केलीय.

कोण आहे शंकर जगताप

दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र भाजप श्रेष्ठींनी शंकर जगताप यांना उमेदवारीची संधी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com