Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam tv

Pimpri Chinchwad : दिवाळीच्याच दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर; फटाके फोडणाऱ्या तरुणाला भरधाव कारने उडविले, थरारक घटना CCTV त कैद

Pimpri Chinchwad : कुटुंबीयांसोबत फटाके उडवीत असताना एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने त्याला चिरडून पळ काढला आहे
Published on

पिंपरी चिंचवड : दिवाळीच्या दिवशी सर्व परिवार आनंदात होता. दिवाळीच्या रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके उडवीत असतानाच तरुणावर काळाने घाला घातला. रस्त्यावरून एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाने ३५ वर्षाच्या तरुणाला जोरदार धडक देऊन उडवील्याची घटना घडली. यात तरुणाचा मृत्यू झाला. 

दिवाळी असल्याने रात्री सर्वजण फटाके उडवत होते. त्यानुसार (Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवडच्या रावेत येथील फेलिसिटी सोसायटी समोर सोहम पटेल (वय ३८) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके उडवीत असताना एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने त्याला चिरडून पळ काढला आहे. या अतिशय दुर्देवी (Accident) अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. दिवाळी सारख्या आनंददायी सणाच्या दिवशी पटेल कुटुंबीयवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Pimpri Chinchwad
Chandwad Vidhan Sabha : नाशिकच्या चांदवड मतदारसंघात काँग्रेसमध्ये फूट; काँग्रेस तालूकाध्यक्षाची बंडखोरी

तो कार चालक सापडेना 

धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात होऊन जवळपास ४८ तास झाल्यानंतरही या अपघातातील आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलं नसल्याने रावेत परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रावेत पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला तात्काळ अटक केली नाही; तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा रावेत परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com