

पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात बुधवारी अचानक वीज पुरवठा खंडित झाला
वीजपुरवठा सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त
भाजप नगरसेवकांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
रात्रभर ऑफिसमध्ये झोपून प्रशासनाचा निषेध केला
पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेवक बापू घोलप चर्चेत आले आहेत. बुधवारी संध्याकाळी वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने या नगरसेवकांने चक्क महावितरणाच्या कार्यालयात झोपून ठिय्या आंदोलन केलं. रात्रभर ते आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह महावितरणाच्या कार्यालयात झोपले होते. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यांचीच सध्या चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील निगडी परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी निगडी येथील एमएसईबीच्या कार्यालयात झोपून ठिय्या आंदोलन केले. निगडी येथील सेक्टर २२ या ठिकाणी बुधवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक काही तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.
मध्यरात्री १ वाजले तरी देखील विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिक वैतागले होते. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे संतापलेले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बापू घोलप आणि उत्तम केंजळे यांनी निगडी येथील महावितरणाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. वीज पुरवठा सुरळीत होण्यास उशीर होत असल्याने या नगरसेवकांनी चक्क आपल्या कार्यकर्त्यांसोबत महावितरणाच्या कार्यालयात झोपून ठिया आंदोलन केले आणि प्रशासनाचा निषेध केला.
एक तर उकाडा वाढल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. अशातच वीज परवठा प्रदीर्घकाळासाठी खंडित झाल्याने निगडी परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. नगरसेवक महावितरणाच्या ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांसोबत झोपल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वत:साठी नाही तर जनतेसाठी लढणाऱ्या या नगरसेवकांचे कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.