Panvel: 'वेबसीरीजमध्ये काम देतो, फोटो पाठव'; अश्लील फोटो पाठवून ४० हजारांची मागणी, अभिनेत्रीची फसवणूक

Panvel Shocking Crime: पनवेलमध्ये १८ वर्षीय अभिनेत्रीला वेबसीरिजमध्ये काम देण्याचं आश्वासन देत फसवणूक, अश्लील फोटो पाठवून ४० हजारांची खंडणी मागितली. डीएन नगर पोलिसांत ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय अभिनेत्रीला वेबसिरिजमध्ये काम देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच तिला मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल केल्याची माहितीही समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये घडला असून, पीडितेनं ब्लॅकमेलिंगला कंटाळून डीएन नगर पोलीस ठाण्यात ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी पीडितेला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला होता. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख प्रॉडक्शन हाऊसचा निर्माता म्हणून सांगितलं. त्याने मेसेज करून वेबसिरीजमध्ये काम करण्याची ऑफर दिली. या फसवणुकीला बळी पडून अभिनेत्रीने तिचा पोर्टफोलिओ, इन्स्टाग्राम प्रोफाइल आणि यू्ट्यूब लिंक्स शेअर केल्या.

मॉर्फ केलेला फोटो अन् ४० हजारांची मागणी

आरोपीने यानंतर तिच्याशी संपर्क साधला आणि तिची दुसऱ्या तरूणाशी ओळख करून दिली. तरूणीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी अनेक गोष्टी केल्या. एवढेच नाही तर तिला मेट्रो आयनॉक्स थिएटरमध्ये बोलावण्यात आलं आणि चित्रपट दाखवण्यात आला. जेव्हा अभिनेत्रीने पुन्हा भेटण्यास नकार दिला तेव्हा तिला ब्लॅकमेल करण्यात आलं.

Crime News
Political: राणे बंधूंमध्ये शीतयुद्ध! नितेश राणेंकडून 'तो' व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीनशॉट व्हायरल, निलेश राणेंवर आरोप

आरोपीने मॉर्फ केले अश्लील छायाचित्र अभिनेत्रीला पाठवले. तसेच ४० हजार रूपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मॉर्फ केलेले फोटो कुटुंबाला आणि सोशल मीडियात व्हायरल करण्याची आरोपींनी धमकी दिली. सततच्या धमक्यांना कंटाळून तिने धाडसाने पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. पीडितेनं डीएन नगर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून, सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Crime News
Shocking: ३ तास उलटा लटकवला, गुप्तांगाला स्पर्श अन् लघवी पाजण्याचा प्रयत्न; तरूणाला बेदम मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com