Rain Alert : पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, पुढील काही तास महत्त्वाचे; ७ दिवसांत १० जणांचा मृत्यू

Palghar Rain Alert News : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिंजाळ नदीने इशारा पातळी ओलांडली असून प्रशासनाने 1,200 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.
PALGHAR RED ALERT: PINJAL RIVER CROSSES WARNING LEVEL, 1,200 RESIDENTS EVACUATED AMID HEAVY RAINFALL
PALGHAR RED ALERT: PINJAL RIVER CROSSES WARNING LEVEL, 1,200 RESIDENTS EVACUATED AMID HEAVY RAINFALLsaam tv
Published On
Summary
  • पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी

  • पिंजाळ नदीने इशारा पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या भागांमध्ये पूराचा धोका वाढला

  • ७ दिवसात १० जणांचा मृत्यू झाला असून मागील २४ तासांत तिघांचा मृत्यू

  • प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

राज्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसाने कहर केला आहे. आज मुंबईसह अनेक शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. विशेषतः पिंजाळ नदीने इशारा पातळी ओलांडल्याने प्रशासन सतर्क झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी विनाकारण नदीकाठावर जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने मोठ्या प्रमाणात स्थलांतराची मोहीम हाती घेतली आहे. काल पालघर तालुक्यातील सुमारे एक हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले, तर डहाणू तालुक्यातील 200 नागरिकांचेही स्थलांतर करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 1,200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा केंद्रांमध्ये राहण्याची, पिण्याच्या पाण्याची तसेच खाद्यपदार्थांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.

PALGHAR RED ALERT: PINJAL RIVER CROSSES WARNING LEVEL, 1,200 RESIDENTS EVACUATED AMID HEAVY RAINFALL
Health Care : जेवल्या जेवल्या लगेच प्रचंड झोप येतेय? तुमच्या ताटातच दडलंय 'हे' मोठं कारण

जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एक जुलैपासून आतापर्यंत पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी मागील 24 तासांत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनांमुळे प्रशासनाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एक टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच झांजरोळी धरण परिसरातही प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

PALGHAR RED ALERT: PINJAL RIVER CROSSES WARNING LEVEL, 1,200 RESIDENTS EVACUATED AMID HEAVY RAINFALL
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

धरणाच्या खालच्या भागातील काही हिस्सा पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला असला तरी धरणाला कोणताही धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, सुरक्षेच्या दृष्टीने धरणालगतच्या चार पाड्यांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्या परिसरात पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com