पालघर जिल्ह्यात ३.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के
डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी आणि मोडगाव परिसरात हादरे
२६ सप्टेंबर रोजी रात्री १०.३३ वाजण्याच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती
भूकंपामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण
पालघरमधून मोठी बातमी समोर आली आहे. पालघर शहर काल म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, काल रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी आणि मोडगाव परिसरात भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा धक्का जाणवताच परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरातील वस्तू तसेच खिडक्या-दारे हलल्याचे काही नागरिकांनी सांगितले. अचानक आलेल्या या धक्क्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडल्याची माहिती आहे.
डहाणू तालुक्यातील या भागात यापूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत अचानक जाणवलेल्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, भूकंपाच्या धक्क्याबाबत अधिकृत यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, तसेच भूकंपाचा धक्का जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.