आगरी सेनेचे प्रवक्ते जयेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला
त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला
विरारच्या विवा कॉलेजमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला
शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही बविआमध्ये प्रवेश केला
Palghar Jayesh Patil Joins Hitendra Thakur Party पालघरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाला पाठिंबा देणाऱ्या आगरी सेनेचे पालघर जिल्हा प्रवक्ते जयेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून अधिकृतपणे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील आगरी सेनेला रामराम करत बविआमध्ये प्रवेश केला.
जयेश पाटील यांनी काल हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश सोहळा विरार येथील विवा कॉलेजमध्ये पार पडला. यावेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जयेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. जयेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच आगरी सेनेच्या प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेर त्यांनी 'बविआ'चा पर्याय निवडत नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. आगरी समाजात जयेश पाटील यांचे दांडगे जनसंपर्क आणि नेटवर्क मजबूत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत असलेल्या आगरी सेनेतील ही फूट भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.