73 लाख किलो, 295 कंटेनर, 30 कोटी किंमत; पाकिस्तानातून भारतात आणलेल्या खडेमिठाचा असा झाला पर्दाफाश

DRI Busts Illegal Pakistan Rock Salt Imports: पाकिस्तानातून भारतात 73 लाख किलो खडेमिठाची अवैध आयात केल्याचा DRI ने पर्दाफाश केला. 30 कोटींच्या या प्रकरणात 295 कंटेनर आणि बनावट कागदपत्रांचे धागेदोरे समोर आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
PAKISTAN ROCK SALT IMPORT RACKET BUSTED
PAKISTAN ROCK SALT IMPORT RACKET BUSTED saam tv
Published On: 

पाकिस्तानातून भारतामध्ये खडेमिठाची अवैध आयात केल्याचा मोठा धक्कादायक प्रकार महसूल गुप्तचर संचालनायाने (DRI) उघडकीस आणला आहे. पाकिस्तानमध्ये उत्पादित झालेल्या तब्बल 7 हजार 311 मेट्रिक टन म्हणजेच सुमारे 73 लाख किलो खडेमिठाची आयात करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या मालाची किंमत सुमारे 30 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.

PAKISTAN ROCK SALT IMPORT RACKET BUSTED
भाजपविरोधात बंडखोराला शिंदेसेनेचा पाठिंबा? पुणे शिक्षक मतदारसंघात चुरस वाढणार

या प्रकरणात आयात करणाऱ्या कंपन्यांचे दोन मालक, एक सीमाशुल्क विभागातील दलाल आणि आयात करणारी कंपनी स्थापन करून चालवणारा दुबईस्थित एका पुरवठादार अशा ४ जणांना अटक करण्यात आली आहे. DRI ने या कारवाईला 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' असे नाव दिले होते. या अंतर्गत मुंबई, पुणे, दिल्लीसह गांधीधाम, आदिपूर, वेरावळ आणि पानिपत या शहरांमध्ये शोधमोहीम हाती घेण्यात आली. या कारवाईत पाकिस्तानमधून उत्पादित झालेल्या खडेमिठाची भारतात अवैधरीत्या आयात करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला.

PAKISTAN ROCK SALT IMPORT RACKET BUSTED
पुण्यातील मेडिकल कॉलेजच्या MBBS च्या 'इतक्या' जागांना मान्यता; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आगाऊ मदत- CM फडणवीस

भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर घातलेली बंदी चुकवण्यासाठी आरोपींनी वेगळीच शक्कल लढवली. खडेमिठाचे मूळ पाकिस्तान असल्याची ओळख लपवण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) काही संस्थांच्या माध्यमातून बनावट प्रमाणपत्रे आणि पावत्या तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांमध्ये मालाच्या मूळ देशाबाबत चुकीची माहिती दाखवण्यात आली. त्यानंतर हा माल श्रीलंकेतील कोलंबो बंदरातून भारतात पाठवण्यात आला.

PAKISTAN ROCK SALT IMPORT RACKET BUSTED
Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

मालाचे पाकिस्तानी मूळ लपवण्यासाठी मालाची पाठवणी आणि संबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार केला असल्याचा आरोपींवर ठेवण्यात आला आहे. या व्यवहारांना आधार देण्यासाठी दुबईस्थित कंपन्यांनी जारी केलेल्या बनावट पावत्यांचा वापर करण्यात आला आहे.

तिसऱ्या देशातून माल पाठवणे, मालाच्या मूळ उगमाबद्दल खोटी घोषणापत्र तयार करणे, बनावट व्यापारी कागदपत्रे आणि अपारदर्शक आर्थिक व्यवस्था यांसारख्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कद्वारे पाकिस्तानी बनावटीच्या मालावरील भारताच्या आयात बंदीला बगल देणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com