Mock Drill : युद्धाचा सायरन वाजला, ब्लास्टिंगचा आवाज घुमला, महाराष्ट्रात कुठे कुठे 'मॉक ड्रील'?

Operation Sindoor : केंद्र सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देशभरातील शहरांची अतिसंवेदनशील, संवेदनशील आणि सामान्य अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यानुसार मुंबई शहराचं नाव अतिसंवेदनशील श्रेणीत टाकण्यात आलं आहे.
Operation Sindoor Maharashtra Mock Drill Update
Operation Sindoor Maharashtra Mock Drill UpdateSaam Tv News
Published On

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक यांसह १६ जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रील पार पडणार आहे. या मॉक ड्रीलदरम्यान सर्वसामान्य नागरिकांना युद्धासारख्या परिस्थितीत स्वतःचं संरक्षण कसं करायचं, याबद्दलचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष तयारी करण्यात आली आहे. मुंबईत आज दुपारी ४ वाजता तब्बल ६० ठिकाणी मॉक ड्रिल सुरु आहे.

केंद्र सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देशभरातील शहरांची अतिसंवेदनशील, संवेदनशील आणि सामान्य अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यानुसार मुंबई शहराचं नाव अतिसंवेदनशील श्रेणीत टाकण्यात आलं आहे. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगली जात आहे. यानुसार मुंबई शहरातील निवडक ६० ठिकाणी एकाच वेळी सायरन वाजवले जाणार आहेत. तसेच या मॉक ड्रीलदरम्यान दक्षिण मुंबईतील एका मोठ्या मैदानात नागरिकांना एकत्र जमण्यास सांगण्यात येणार आहे. या ठिकाणी त्यांना युद्धजन्य परिस्थितीत कसं वर्तन करावं. स्वतःचं संरक्षण कसं करावं, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणा आहे.

Operation Sindoor Maharashtra Mock Drill Update
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा पुढचा प्लान काय? अजित डोवाल यांचा पाकिस्तानला इशारा

दरम्यान, भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचं ९ तळ नष्ट केलं. या कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहरचं संपूर्ण कुटुंब मारलं गेल्याची माहिती समोर आली आहे. मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा करण्यात आला आहे. याचदरम्यान, दहशतवादी मसूद अझहरनं एक पत्रक जारी करून म्हटलंय की, 'भारताच्या हल्ल्यात मीही मेलो असतो तर बरं झालं असतं. तसेच, भारत आता कुणाची दया करणार नाही', असंही मसूदनं म्हटलं आहे.

Operation Sindoor Maharashtra Mock Drill Update
Operation Sindoor : 'एक चिमूट सिंदूरची किंमत...' पाकडे कधीच विसरणार नाहीत, भारतानं १०० किमी घरात घुसून अद्दल घडवली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com