Maharashtra Politics: ...यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, CM फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी

CM Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानं आणि कृतीमुळे सरकार अडचणीत आले आहे. विरोधक सरकारवर टीका करत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांची बैठक घेत त्यांना तंबी दिली.
Maharashtra Politics: ...यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, CM फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी
CM Devendra Fadnavis News Saam tv
Published On

Summery:

  • वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलीच तंबी दिली

  • वादग्रस्त विधान आणि वादग्रस्त कृती करणाऱ्या मंत्र्यांमुळे सरकारची बदनामी

  • मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी २० मिनिटं मंत्र्यांची शाळा घेतली

  • यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सांगितले

'यापुढे एकही चूकीचा प्रकार खपवून घेणार नाही', असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना चांगलीच तंबी दिली. राज्यातील मंत्र्यांच्या वादग्रस्त विधान आणि कृतीमुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारची बदनामी होत आहे. या सर्व घटनानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मंत्र्यांची चांगलीच शाळा घेतली. २० मिनिटं त्यांनी या मंत्र्यांचा क्लास घेतला आणि आता एकही चूक खपवून घेणार नाही, असं त्यांनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तब्बल २० मिनिटं सगळ्या मंत्र्यांचा क्लास घेतला. 'वादग्रस्त विधाने, वादग्रस्त कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करूच. आता एकही प्रकार खपवून घेणार नाही.' असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांना सज्जड दम दिला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Politics: ...यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, CM फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी
Devendra Fadnavis: माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद जाणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? VIDEO

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कृषी, ग्रामविकास, विधी व न्याय विभागाअंतर्गत वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या. ही महत्वपूर्ण बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सज्जड दम दिला. यापुढे कुठलेही वक्तव्य, कृती खपवून घेतल्या जाणार नाही असे त्यांनी मंत्र्यांना सांगितले. त्याचसोबत त्यांनी जे चूका करतात त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असे देखील सांगितले.

Maharashtra Politics: ...यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, CM फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी
Devendra Fadanvis Birthday: फडणवीस थकत कसे नाहीत? राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळेल! शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून स्तुतिसुमने|VIDEO

दरम्यान, महायुतीमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि कृतींमुळे महाराष्ट्र सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यामध्ये पैशांनी भरलेली बॅग दिसत होती. त्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी अनेक वागग्रस्त विधाने देखील केले होते. या सर्व मंत्र्यांच्या कृतीमुळे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Maharashtra Politics: ...यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, CM फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी
Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com