मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

BJP leader caught sleeping during speech: भाजपच्या नियोजन मेळाव्यात माजी खासदार अशोक नेते मंचावर झोपलेले दिसून आले, त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. अनेकांनी भाजप नेत्यांच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
BJP leader caught sleeping during speech
BJP leader caught sleeping during speechSaam tv news
Published On

सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद होतो आणि काही क्षणांतच तो व्हायरलही होतो. नेते मंडळींचेही काही व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होतात. काल वर्धा येथे पार पडलेल्या भाजपच्या नियोजन मेळाव्यात एक अनोखी घटना घडली. गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते हे मंचावरच झोपलेले दिसून आले. विशेष म्हणजे, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन करत होते. दरम्यान, त्यांचा डुलकी घेत असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोमवारी वर्धा येथे भाजप नियोजन मेळावा पार पडला. या मेळाव्यात विदर्भातील भाजपचे आजी-माजी खासदार, आमदार, तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्ष संघटना मंजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करत होते. त्यांचं भाषण सुरू असताना एक अनोखी घटना घडली. भाजप नेते आणि माजी खासदार अशोक नेते यांना झोपेची डुलकी लागली.

BJP leader caught sleeping during speech
Gold Rates: खरेदीला लागा! सोन्याच्या दरात घसरण, १० तोळं सोनं १,१०० रूपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

त्यानंतर मंचावर झोपलेला क्षण उपस्थितांच्या नजरेतून सुटला नाही. काहींनी याचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियात व्हायरल केला. दरम्यान, काही क्षणातच संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेचा विषय ठरला. या प्रकारामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काही जणांनी भाजप नेत्यांच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

BJP leader caught sleeping during speech
खडसेंच्या जावयाला ठरवून ट्रॅपमध्ये अडकवलंय, कॉल करून बोलावलं अन्.. हॅकरचा मोठा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com