New india Co-operative bank : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई, बडा मासा गळाला लागला

New india Co-operative bank update : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील बडा मासा गळाला लागला आहे. हितेश मेहताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
New india Co-operative bank scam
New india Co-operative bank Saam tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही

मुंबईमधील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातील बडा मासा गळाला लागला आहे. पोलिसांनी बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहताला ताब्यात घेतलं आहे. हितेश मेहतावर १२२ कोटींच्या हेराफेरीचा आरोप आहे.

New india Co-operative bank scam
Fake insurance scam Pune: LIC पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक, पुण्यातून ३ जणांना ठोकल्या बेड्या

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहताने बँकेची तिजोरी लुटण्याचा प्रकार केला आहे. हितेश मेहतावर १२२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

काय आहे आरोप?

हितेश मेहता बँकेचा महाव्यस्थापक होता. हितेशवर दादर आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी होती. त्यावेळी हितेशने पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांमधील खातेदारांच्या खात्यांमधील १२२ कोटींचा घोटाळा केला. हितेश मेहताचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेचे मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी एफाआयआर नोंदवून घेतला.

पोलिसांना संशय आहे की, हितेश आणि आणखी एक व्यक्ती घोटाळ्यात सामील आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आला आहे. आरोपी हितेश मेहतावर महाव्यवस्थापक होतं. घोटाळ्यादरम्यान त्याच्याजवळ बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगावच्या शाखेचा कारभार होता.

New india Co-operative bank scam
Gay Dating App Scam : बुलाता है मगर जाने का नहीं! गे डेटिंग अ‍ॅपवर ओळख, घरी बोलावून ब्लॅकमेल, पुढं घडलं भयंकर...

बँक घोटाळा प्रकरणी आरोपी हितेश पटेलला समन्स पाठवण्यात आलं आहे. बँकेत जमा करण्यात येणाऱ्या पैशांची एन्ट्री बुक्स ऑफ अकाऊंटमध्ये केली जाते. याच बुक्स ऑफ अकाऊंटची टॅली करण्यात आली. त्यावेळी १२२ कोटींची तूट आढळली. त्यानंतर हितेश मेहताच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. हितेश मेहतावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. बँकेच्या बुक्स ऑफ अकाऊंटच्या संपूर्ण माहितीचं फोरेन्सिक ऑडिट केलं जाणार आहे.

New india Co-operative bank scam
Teachers Salary Scam: शिक्षकांची पगारवाढ बोगस; बनावट अध्यादेशाद्वारे 17 लाखांची फसवणूक

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लावले आहेत. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर अनेक प्रकारची निर्बंध घातले आहेत. बँकेला आता ग्राहकांना कर्ज देता येणार नाही. ठेवीदारांनाही पैसे काढण्यावर मर्यादा आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com