Gay Dating App Scam : बुलाता है मगर जाने का नहीं! गे डेटिंग अ‍ॅपवर ओळख, घरी बोलावून ब्लॅकमेल, पुढं घडलं भयंकर...

Dating App Scam : समलिंगी डेटिंग अ‍ॅपचा वापर करुन एक टोळी लोकांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळत होती. पोलिसांनी विशेष ऑपरेशन करुन या टोळीला पकडले आहे. या टोळीतील दोन आरोपी अजूनही फरार आहेत.
Gay Dating App Scam
Gay Dating App ScamFreepik
Published On

Dating App Scam News : समलिंगी डेटिंग अ‍ॅपचा वापर फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सुरुवातीला अ‍ॅपवरुन लोकांशी ओळख करत, नंतर त्यांचे गुप्तपणे चित्रीकरण करत आणि पुढे त्या चित्रीकरणावरुन ब्लॅकमेल करत होते. गाझियाबाद पोलिसांनी खास ऑपरेशन करुन या टोळीला जेरबंद केले आहे.

एका पीडित व्यक्तीने समलिंगी डेटिंग अ‍ॅपवरुन फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. 'आरोपींनी ग्राइंडर (Grindr) या समलिंगी डेटिंग अ‍ॅपवरुन माझ्याशी संपर्क साधला. बोलणं सुरु झाल्यावर एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये भेटायला बोलावले. पुढे फ्लॅटमध्ये पीडिताचे चित्रीकरण केले आणि त्यावरुन ब्लॅकमेल करत माझ्याकडून १.४ लाख रुपये उकळले', अशी माहिती पीडित व्यक्तीने पोलिसांना दिली.

सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहतीनुसार, या टोळीला पकडण्यासाठी गुप्तचरांच्या मदतीने एक विशेष ऑपरेशन करण्यात आले. एनडीआरएफ रोडजवळ आरोपींना अटक करण्यात आली. टोळीचा रिंकू, अजय आणि शुभम या तिघांना गाझियाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेत दोन आरोपी अजूनही फरार आहे.

Gay Dating App Scam
Buldhana News: 'बाळाच्या पोटात बाळ' दुर्मिळ घटनेतील महिलेची सुरक्षित प्रसुती, दोघांचीही प्रकृती स्थिर

या टोळीचा सूत्रधार रिंकू होता, तर अजय पीडितांना प्रलोभन दाखवून फसवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी रिंकूकडून तीन मोबाईल फोन, दहा हजार रुपये रोख रक्कम आणि ओळखपत्रे जप्त केली आहे. पीडितांना ब्लॅकमेल करत असलेली ही टोळी २ जानेवारीपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती.

Gay Dating App Scam
Chandrahar Patil: शिवराजने खरं तर पंचांना गोळ्या घालायला पाहिजेत; महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com