NEET पेपर पुण्यातूनच देशात व्हायरल? 150 प्रश्नांसाठी 10 लाखांचा व्यवहार?

CBI Probe Exposes Pune Link in Massive: नीटचा पेपर ना राजस्थानात फुटला ना केरळात...हा पेपर फुटला शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात.... पुण्यात हा पेपर कसा फुटला? तो देशभरात कसा व्हायरल झाला? प्रत्येक प्रश्नासाठी किती लाख रुपये घेण्यात आले? यावरचा हा विशेष रिपोर्ट
CBI uncovers Pune as the origin point of the NEET paper leak that spread across multiple states via Telegram
CBI uncovers Pune as the origin point of the NEET paper leak that spread across multiple states via Telegramsaam tv
Published On

मोटेगावकरनं NTAच्या मुख्य पॅनेलमध्येच आपली माणसे पेरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच फोडण्यात आल्याचं उघड झालंय. पुण्यातूनच ही प्रश्नपत्रिका राजस्थानमार्गे देशभरात पोहोचल्याचं सीबीआयच्या तपासात उघडकीस झालंय. आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफ फाईल्स गुरुग्राममार्गे राजस्थानपर्यंत पोहोचवल्याची माहिती समोर आलीये. विशेष म्हणजे, नीट परीक्षेच्या प्रश्नांसाठी तब्बल लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचंही सीबीआयच्या तपासात निष्पन्न झालंय. NEETची प्रश्नपत्रिका पुण्यातून राजस्थानात कशी पोहोचली पाहूयात...

NEETची प्रश्नपत्रिका पुण्यातून राजस्थानात

पुण्यातील मनीषा वाघमारेकडून प्रश्नपत्रिका धनंजय लोखंडेकडे

धनंजय लोखंडेनं प्रश्नपत्रिका शुभम खैरनारला दिल्या

खैरनारनं टेलिग्रामवरून PDF गुरुग्राममधील यश यादवला पाठवल्या

यादवनं प्रश्नपत्रिका राजस्थानमध्ये मांगीलाल बिवालपर्यंत पोहोचवली

मूळ प्रश्नपत्रिकेतील सुमारे 150 प्रश्न जुळल्यास 10 लाख रुपयांचा सौदा

मांगिलालनं प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट काढून आपल्या मुलासह इतरांना दिल्या

याचाच सखोल तपास करण्यासाठी या प्रकरणातील प्रमुख आरोपी मनिषा मांढरे, मनिषा वाघमारे आणि धनंजय लोखंडे या तिघांना चौकशीसाठी दिल्लीहून पुण्यात आणलंय. तिघं आरोपींना समोरासमोर बसवून सीबीआयकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे... मांढरे आणि वाघमारे या पुण्यातील सुखसागर परिसरातील एकाच इमारतीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे...दरम्यान मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरमधूनच NEET पेपर फोडण्याचा कट रचल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे..

हा फोडलेला पेपर पुण्यातून राजस्थानात आणि तिथून हरियाणानंतर उत्तराखंड आणि केरळमध्ये व्हायरल झाल्याचं समोर आलंय कुठून कसा गेला ते पाहूयात खरंतर, पैशांच्या मोहापायी काही जणांनी शिक्षकी पेशाला काळीमा फासत गोरखधंदा सुरु केल्याचं या प्रकरणातून सिद्ध झालंय. त्यामुळे पुढील काळात सीबीआयच्या तपासात नीट पेपर फुटी प्रकरणाचे आणखी नवे धागेदारे समोर येतात का आणि या प्रकरणात कुणा बड्या धेंडाचे लागेबांधे आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com