Rohit Pawar on Jawan Movie: 'जवान' चित्रपटात लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न; रोहित पवारांकडून शाहरुख खानचं कौतुक

Rohit Pawar on Jawan Movie: 'शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटामध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे , अशा शब्दात रोहित पवार यांनी कौतुक केलं आहे.
Rohit Pawar on Jawan Movie
Rohit Pawar on Jawan MovieSaam tv
Published On: 

Rohit Pawar on Jawan Movie:

शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. जवान सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून देशभरात हवा पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही आवडला आहे. त्यांनी या सिनेमाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

'शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटामध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे , अशा शब्दात रोहित पवार यांनी कौतुक केलं आहे. (Latest Marathi News)

रोहित पवार आज कल्याणच्या दौऱ्यावर होते. रोहित पवार यांनी आज कल्याणमधील अगरवाल कॉलेजमध्ये आयोजित गांधी पर्व कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी रोहित पवार यांनी 'जवान' चित्रपटाचं कौतुक केलं.

Rohit Pawar on Jawan Movie
Ambadas Danve News: 'पावसामुळे नागपूरची दयनीय अवस्था म्हणजे...'; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

रोहित पवार म्हणाले, 'शाहरुख खान यांच्या 'जवान' या चित्रपटामध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमात लोकांचे वास्तव प्रश्न दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद वापरत नाहीत, तोपर्यंत चांगल्या विचारांचे लोक निवडून येणार नाहीत'.

याचदरम्यान, शरद पवार आणि उद्योजक गौतम अदानी भेटीविषयी प्रसारमाध्यमांवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, ' शरद पवार हे अंबानी-अदानी यांच्यासह छोट्या व्यवसायिकांनाही भेटतात. या सगळ्यांना भेटल्यानंतर आपल्याला आपल्या राज्याचा देशाचा विकास कसा करता येईल, याबाबत कोठे ना कुठेतरी चर्चा होत असते. त्यावरून आपण योजना करतो, सगळ्या घटकाला भेटल्याशिवाय योजना कधीही करता येत नाही'.

निवडणूक आयोगाविषयी भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, 'निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातले बाहुले आहे, असं माझं नागरिक म्हणून वैयक्तिक मत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या निर्णयावर देशात खूप मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी एका पक्षाची भूमिका घेण्यापेक्षा लोकशाहीची भूमिका घेणे अपेक्षित आहे. मला असं वाटतं हा विषय कोर्टात गेल्यानंतर न्याय उद्धव ठाकरेंना मिळेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.