Ambadas Danve News:
Ambadas Danve News:Saam tv

Ambadas Danve News: 'पावसामुळे नागपूरची दयनीय अवस्था म्हणजे...'; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Ambadas Danve News: जोरदार पावसामुळे नागपुरकरांचं जनजीवन विस्कळीत झाली आहे. पावसाच्या या स्थितीवरून अंबादास दानवेंनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

Ambadas Danve On Nagpur Rain:

नागपुरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. जोरदार पावसामुळे नागपुरकरांचं जनजीवन विस्कळीत झाली आहे. पावसाच्या या स्थितीवरून अंबादास दानवेंनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपुरातील पावसाच्या परिस्थितीवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. अंबादास दानवे म्हणाले, 'पावसामुळे नेहमी मुंबईवर आरोप होतात. मुंबईत पाणी तुंबते म्हणून आरोप झाले आहेत. पण नागपूरची दयनीय अवस्था म्हणजे मोठ्या घरचा पोकळ वासा. नेतृत्व आणि व्यवस्थापनात हा पोकळ वासा दिसतोय'.

Ambadas Danve News:
Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला गेली, दरदरून घाम फुटला अन् खाली कोसळली; तरुणीसोबत काय घडलं?

'एका पावसात ही अवस्था झाली आहे. नागपूरच्या जनतेला मदत झाली पाहिजे. आपत्तीग्रस्तांना सगळ्या व्यवस्था झाली पाहिजे. दुष्काळाची स्थिती अनेक जिल्ह्यात आहे. पाऊस न पडणे म्हणजे दुष्काळ नाही. एकही शेतकऱ्याला २५ टक्के अग्रिम मिळालेला नाही. अशी स्थिती असताना शासन आपल्या दारी म्हणून भूमिका घेत आहे,अशी टीका दानवे यांनी केली.

'आत्महत्या झालेल्या १४०० शेतकऱ्यांची यादी हे सरकार आल्यापासून घडलेल्या आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवतो. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन आले. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. याना दिल्लीत मुजरा लावणे आणि तळवे चाटणे इतकचं सुरू आहे, अशी टीका देखील दानवे यांनी पुढे केली.

Ambadas Danve News:
Maharashtra Rain Update: राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे; मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, जाणून घ्या सर्व अपडेट

'केद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईला यायच्या आधी उद्योजक गौतम अदानी यांना भेटले. शरद पवार हे अदानी यांच्याकडे गेले तरी अदानी हे भ्रष्टाचारी अशी आमची भूमिका आहे, असे ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com