Maharashtra Rain Update: राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे; मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, जाणून घ्या सर्व अपडेट

Maharashtra Rain Update: राज्यातील काही जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासांत पावसांच्या जोरदार सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Maharashtra Rain Alert Weather Updates Paus
Maharashtra Rain Alert Weather Updates Paus Saam TV

अक्षय बडवे

Maharashtra rain Update: राज्यातील काही भागात काल रात्रीपासून पाऊस कोसळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासांत पावसांच्या जोरदार सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Latest Marathi News)

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, जालना, संभाजीनगरमध्ये पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील ३ ते ४ तास नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, ठाणे या जिल्ह्यात देखील पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्यात आज पुण्यात सकाळपासून पावसाची संतधार सुरू आहे.

Maharashtra Rain Alert Weather Updates Paus
Nagpur Rain News: नागपुरात पावसाचा कहर! रस्त्यांवर, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ; शाळा- महाविद्यालयांना सुट्टी

दरम्यान,हवामानतज्ज्ञ शिल्पा आपटे म्हणाल्या की, 'उद्यापासून पुढील ३ दिवस विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात मॉन्सून अतिसक्रिय असल्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर उद्यापासून २९ सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी राहील, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या हवामानतज्ज्ञांनी दिली आहे

हवामाने विभागाने मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच याबरोबर सोमवारपासून २५ सप्टेंबर भारतातून परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

जोरदार पावसामुळे नागपूर पाण्याखाली

नागपुराला काल रात्रीपासून पावसाने झोडपून काढलं आहे. जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. रौद्ररुप धारण केल्याने संपूर्ण शह पाण्याखाली गेलं आहे. पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरफचं पथक रेस्क्यू करत आहे.

भंडारा-गोंदियात रात्रभर मुसळधार पाऊस

भंडारा-गोंदियात गेल्या तीन दिवसांपासून पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या तिन्ही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. सततच्या वीजांच्या कडकडामुळे काही भागातील विद्युतप्रवाह खंडित झाला आहे.

Maharashtra Rain Alert Weather Updates Paus
Ulhasnagar News: उल्हासनगर येथील सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; २ कामगारांचा जागीच मृत्यू, पाच जखमी

जिल्ह्यातील शेतजमिनी पाण्याखाली

या पावसामुळे जिल्ह्यात शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. तसेच अनेक मार्ग जलमग्न होऊन वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर अनेक घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच वैनगंगा नदीही धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 ही दरवाजे उघडण्यात आले आहे. तसेच या धरणाचे एकूण दरवाजे उघडण्याची ही नववी वेळ आहे. तसेत अद्याप या मुसळधार पावसामुळे कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com