Nawab Malik: राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांची तब्येत बिघडली; कुर्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू

Nawab Malik Health: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Nawab MAlik
Nawab MAlikSaam Tv

NCP Nawab Malik health Deteriorated

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने मलिक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या कुर्ला येथील रुग्णालयात नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nawab MAlik
Ambadas Danve: मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, ठाकरेंसोबतच राहणार; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने अटक केली होती. डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार करणे, तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भात ईडीने त्यांची कसून चौकशी केली होती.

यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) अनेक दिवस तुरुंगात होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर काही दिवसांतच नवाब मलिक यांना जामीन मिळाला होता. वैद्यकीय कारणामुळे मलिक यांना कोर्टाने जामीन दिला होता. तुरुंगाबाहेर आल्यानंतर मलिक यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाला आपला पाठिंबा दर्शविला होता.

विधिमंडळ अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी गटात बसले होते. यावरुन ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुती सरकारमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असं म्हटलं होतं.

“सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…”, असे कॅप्शन असलेले पत्र देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवारांना लिहलं होतं. त्यानंतर बरेच दिवस नवाब मलिक अजित पवार गटासोबत दिसले नाहीत. तब्येत बरी नसल्याने ते घरीच आराम करत होते. शनिवारी दुपारी नवाब मलिक यांची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Nawab MAlik
Maval Lok Sabha: शिंदे गटाचं टेन्शन मिटलं, मावळ लोकसभेसाठी महायुतीची एकजूट; श्रीरंग बारणे हॅट्ट्रिक करणार का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com