

नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. नवी मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. १० तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्यामुळे नवी मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेचे भोकरपाडा जलशुद्धीकरण आणि मोरबे धरण ते दिघा जलवाहिनी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज १० तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. दुरिस्तीच्या कामामुळे आज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत नवी मुंबई शहरात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
आज नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद राहिल तर उद्या म्हणजे शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात येत आहे. नवी मुंबईतील सर्वच भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.