Navi Mumbai: नवी मुंबईत गोळीबाराचा थरार, सामाजिक कार्यकर्त्यांवर धाड धाड गोळ्या झाडल्या

Navi Mumbai Crime: नवी मुंबईमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली.
Navi Mumbai: नवी मुंबईत गोळीबाराचा थरार, सामाजिक कार्यकर्त्यांवर धाड धाड गोळ्या झाडल्या
Published On

Summary -

  • नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये गोळीबाराची घटना

  • सामाजिक कार्यकर्त्यावर गोळ्या झाडल्या

  • या गोळीबारात दोघे जण जखमी झाले

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईत गोळीबाराची घटना घडली. ऐरोलीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ऐरोलीमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली परिसरातील साईनाथ वाडीमधील छत्रपती चाळीमध्ये ही घटना घडली. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसर हादरून गेला. गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिक घाबरले. सध्या ऐरोलीमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या गोळीबाराच्या घटनेत सामाजिक कार्यकर्ते संदीप गवस आणि अमित मोर्या हे जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.

Navi Mumbai: नवी मुंबईत गोळीबाराचा थरार, सामाजिक कार्यकर्त्यांवर धाड धाड गोळ्या झाडल्या
Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

पोलिसांनी सांगितले की, मोटरसायकलवरून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने अचानक बंदुकीतून तीन राऊंड फायर केले. सामाजिक कार्यकर्त्याच्या दिशेने त्याने गोळीबार केला होता. सामाजिक कार्यकर्ता आणि आणखी एकाच्या शरीरात गोळ्या घुसल्या. या गोळीबारात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

Navi Mumbai: नवी मुंबईत गोळीबाराचा थरार, सामाजिक कार्यकर्त्यांवर धाड धाड गोळ्या झाडल्या
Crime: १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, घरी जाताना अपहरण करत फ्लॅटवर नेलं अन्...; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या गोळीबार प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. या घटनेमुळे सध्या ऐरोलीमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा गोळीबारा नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला होता याचा तपास पोलिस करत आहेत.

Navi Mumbai: नवी मुंबईत गोळीबाराचा थरार, सामाजिक कार्यकर्त्यांवर धाड धाड गोळ्या झाडल्या
Pune Crime : आईने स्वत:च्या बाळाचा जीव घेतला, घराच्या ओट्यावर आपटून संपवलं; चौकशीत सांगितलं धक्कादायक कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com