Navi Mumbai News : कुर्ला स्क्रॅप मार्केटमधील गोदामाला भीषण आग; घटनास्थळी आगीचे लोळ

Navi Mumbai News Update : मानखुर्दच्या मंडल विभागातील कुर्ला स्क्रॅप मार्केटमधील गोदामांला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
Navi Mumbai News
Navi Mumbai NewsSaam Digital

मानखुर्दच्या मंडल विभागातील कुर्ला स्क्रॅप मार्केटमधील गोदामांला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र आगीत गोदामात असलेल्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घटनास्थळी आगीचे लोळ उठले होते.

यवतमाळमध्ये वीज कोसळून बैल जोडी ठार

यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील मार्की (बु) येथील दिवाकर रामदास ढेंगळे यांच्या शेतात वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची घटना घडली. मुच्ची शेत शिवारात शेतकऱ्यांचे शेत असून लिंबाच्या झाडाच्या खाली आपले स्वतःच्या मालकीचे बैल बांधले होते, मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने रौद्ररूप धारण केले व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात बैलावर वीज पडली आणि जागीच ठार झाले.

Navi Mumbai News
Bhandara News: भंडाऱ्यात भीषण अपघात, 27 मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले

गडचिरोली शहरानजीक पेट्रोल पंपावर ट्रकने घेतला पेट

गडचिरोली शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर ट्रकने अचानक पेट घेतला. चालत्या ट्रकचे इंजन गरम होऊन इंजनीत आग लागली. ही घटना चालकाच्या लक्षात येताच चालक, वाहक दोघे ट्रक पेट्रोल पंपावरनजीक थांबवून खाली उतरले. पेट्रोल पंप आणि ट्रकमध्ये थोडं अंतर राहिल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Navi Mumbai News
Nashik News : टोल कर्मचाऱ्यांनी केली अरेरावी; संतप्त नागरिकांनी मालेगाव -कुसुंबा रोडवरील फोडला टोलनाका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com