भंडाऱ्यात भीषण अपघात, 27 मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले
Pauni Accident NewsSaam Tv

Bhandara News: भंडाऱ्यात भीषण अपघात, 27 मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले

Pauni Accident News: भंडारा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ आज मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याची घटना घडली आहे. या वाहनात 27 मजूर होते. वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे.
Published on

Bhandara News:

>> शुभम देशमुख

भंडारा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ आज मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याची घटना घडली आहे. या वाहनात 27 मजूर होते. वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे.

या अपघातात 14 मजूर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यामधील दोन जण गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णायात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी मजूर हे अड्याळजवळील नेरला येथील असून सोनेगाव येथे धान कापणीला जात होते. जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी धडाक्यात सुरू आहे. शेतकरी ट्रॅक्टर व मजुरांच्या सहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत.

धान कापणीला मजूर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजूर बोलावून शेतीची कामे उरकून घेत आहेत. अड्याळ जवळील नेरला येथील 27 मजूर हे धान कापणीसाठी वाहनाने नेरला येथून सोनेगाव येथे जात असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहनचालक मालक महेंद्र मुरकुटे रा.नेरला याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन एका शेताच्या बांधावर उलटले. त्यात वाहनातील 27 मजूर जखमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com