'गुड टच-बॅड टच' सत्रात उघडकीस आलं नराधम वॉचमनचं काळं कृत्य; नेमकं काय घडलं?

Navi Mumbai Kamothe Watchman Molestation Case Details: नवी मुंबईतील कामोठे परिसरात वॉचमनकडून तीन अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘गुड टच-बॅड टच’ सत्रादरम्यान उघड झालेल्या या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Police arrest society watchman in Navi Mumbai after CCTV evidence confirms misconduct with minor girls in Kamothe.
Police arrest society watchman in Navi Mumbai after CCTV evidence confirms misconduct with minor girls in Kamothe.saam tv
Published On

विकास मिरगणे, साम टीव्ही

नवी मुंबई: कामोठे परिसरात एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका सोसायटीतील वॉचमनने तीन अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शाळेत मिळालेल्या 'गुड टच-बॅड टच'च्या माहितीमुळे या मुलींना आपल्यासोबत काहीतरी चुकीचे घडत असल्याची जाणीव झाली आणि हा प्रकार उघडकीस आला.

Police arrest society watchman in Navi Mumbai after CCTV evidence confirms misconduct with minor girls in Kamothe.
SSC Result 2026: मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

संबंधित पीडित मुलींच्या शाळेत विद्यार्थिनींसाठी 'गुड टच' आणि 'बॅड टच' या विषयावर जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रादरम्यान शिक्षकांनी दिलेल्या माहितीनंतर एका मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग शिक्षकांना सांगितला. मुलीने दिलेल्या माहितीमुळे शिक्षकही थक्क झाले. त्यांनी तातडीने पालकांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

Police arrest society watchman in Navi Mumbai after CCTV evidence confirms misconduct with minor girls in Kamothe.
Pune Accident: PMPML चे अध्यक्ष आव्हाड यांच्या कारला भीषण अपघात, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर घडली घटना

पोलिसांची कारवाई आणि सीसीटीव्ही पुरावा

पालकांनी या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये आरोपी वॉचमनचे गैरवर्तन स्पष्टपणे दिसून आले. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वॉचमनला बेड्या ठोकल्या आहेत.

Police arrest society watchman in Navi Mumbai after CCTV evidence confirms misconduct with minor girls in Kamothe.
डोंबिवलीत फेरीवाल्यांचा हैदोस! महापालिका अधिकाऱ्याला बांबूने मारहाण

या प्रकरणावर बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी सांगितले की, "अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशील आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशा नराधमांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com