संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
डोंबिवली शहरातील पेंढारकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली असून केडीएमसीच्या अधिकाऱ्यावर थेट हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिक्रमणाविरोधात कारवाई करत असताना एका सँडविच विक्रेत्याने अधिकाऱ्यावर बांबूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत केडीएमसीचे अधिकारी सुरेश कामराज जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला असून शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेंढारकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी केडीएमसीचे पथक पोहोचले होते. यावेळी कारवाईला विरोध करत संबंधित सँडविच विक्रेत्याने आक्रमक भूमिका घेतली आणि थेट अधिकाऱ्यावर हल्ला चढवला. बांबूने मारहाण केल्याने कामराज गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला असून फेरीवाल्यांच्या वाढत्या दादागिरीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.