

Navi Mumbai International Airport Good News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) सुरू होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत आहे. विमानतळ प्रशासनाने 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी झालेली पहिली प्रवासी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती दिली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. २५ डिसेंबरपासून विमानतळावर नियमित उड्डाणांना सुरुवात होणार आहे. त्याआधी प्रवाशी चाचणी घेण्यात आली. २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
दोन दिवस झालेली ही चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.NMIAच्या व्हिडिओनुसार शेकडो स्वयंसेवकांना प्रवासी बनवून पूर्ण प्रक्रियेचे सिम्युलेशन करण्यात आले. यात चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेमपर्यंत सर्व टप्प्यांची काटेकोर तपासणी करण्यात आली. इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला. प्रवाशांची ही चाचणी यशस्वी झाल्याची महिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. 19,650 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार करण्यात आलेले हे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड विमानतळ ठरणार आहे. मुंबईतील CSMIA विमानतळावरील वाढत्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यास NMIA महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
"२५ डिसेंबरपासून उड्डाणांना सुरुवात करण्याच्या तयारीत आम्ही लवकरच तुम्हा सर्वांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत! आमच्या ORAT टीमने शेकडो सिम्युलेटेड प्रवाशांसह पहिली प्रवासी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. चेक-इनपासून सुरक्षा, बोर्डिंग आणि बॅगेज रीक्लेमपर्यंत सर्व टप्प्यांची परिपूर्ण चाचणी करण्यात आली. आमच्या 'पहिल्या प्रवाशांचे', CISF, L&T, एअरलाइन पार्टनर्स आणि संपूर्ण NMIAL टीमचे मनःपूर्वक आभार,अशी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली.
२५ डिसेंबरपासून १० शहरांसाठी इंडिगोची सेवा
२५ डिसेंबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. त्यायासाठी बुकिंग याआधीच सुरू करण्यात आले आहे.
२५ डिसेंबरसाठी नवी मुंबई विमानतळावरुन तिकिट
नवी मुंबई-दिल्ली - इंडिगो - ६ हजार २७४ रुपये अकासा - ५ हजार ७७६ रुपये
नवी मुंबई- नागपूर - इंडिगो - ७ हजार २६७ रुपये
नवी मुंबई-कोच्ची - इंडिगो - ९ हजार ११६ रुपये अकासा - ७ हजार ३७३ रुपये
२६ डिसेंबरसाठी नवी मुंबई विमानतळावरुन तिकिट
नवी मुंबई-दिल्ली - इंडिगो - ६ हजार ११६ रुपये अकासा - ५ हजार ७७६ रुपये
नवी मुंबई-नागपूर - इंडिगो - ५ हजार ७४४ रुपये
नवी मुंबई-कोच्ची - इंडिगो - १५ हजार ४३४ रुपये अकासा - २४ हजार १६० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.