टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Navi Mumbai Fake Country Liquor Seizure Worth Rs 44.10 lakh: नवी मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. जुईनगर रेल्वे स्टेशनसमोर बनावट देशी दारूचे ६०० बॉक्स आणि दहा चाकी ट्रक असा ४४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Navi Mumbai fake country liquor seizure worth Rs 44.10 lakh
Navi Mumbai fake country liquor seizure worth Rs 44.10 lakhsaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दहा चाकी ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जी विभागाने कारवाई केली. या कारवाईत बनावट देशी दारूचे ६०० बॉक्स आणि ट्रक असा एकूण ४४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त बातमीदारामार्फत बनावट देशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नवी मुंबईतील जुनेनगर रेल्वे स्टेशनसमोर, पनवेल-सायन महामार्गावर संशयित ट्रक अडवण्यात आला.

Navi Mumbai fake country liquor seizure worth Rs 44.10 lakh
Vidhan Parishad Election: महायुतीनं उमेदवारी नाही दिली तर आम्ही देऊ; मंगेश चिवटेंना कोणी दिली ऑफर?

राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त बातमीदारामार्फत बनावट देशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नवी मुंबईतील जुनेनगर रेल्वे स्टेशनसमोर, पनवेल-सायन महामार्गावर संशयित ट्रक अडवण्यात आला. अशोक लेलँड कंपनीच्या लाल रंगाच्या दहा चाकी ट्रकमधून बनावट देशी दारूची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली. या वेळी ट्रकमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले. तपासणीदरम्यान टँगो पंचच्या १०० मिली क्षमतेच्या आणि ठोकी संत्राच्या ९० मिली क्षमतेच्या बनावट देशी दारूच्या बाटल्यांचे एकूण ६०० बॉक्स मिळून आले.

Navi Mumbai fake country liquor seizure worth Rs 44.10 lakh
शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

विभागाने बनावट दारूचा साठा आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा MH-40-N-6629 क्रमांकाचा ट्रक जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४४ लाख १० हजार रुपये असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दारूबंदी गुन्हा नोंदवून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Navi Mumbai fake country liquor seizure worth Rs 44.10 lakh
फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधीक्षक प्रवीण तांबे, उपअधीक्षक रत्नमाला गायकवाड आणि प्र. उपअधीक्षक आनंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक पुंडलिक धुळे तसेच विभागातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com