नवी मुंबईत भाजपमधील वाद टोकाला; नाईक-म्हात्रे वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

navi mumbai politics : नवी मुंबईत भाजपमध्ये सुरु असलेला संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय...आमदार मंदा म्हात्रे आणि मंत्री गणेश नाईकांमध्ये कशावरून वाद पेटलाय? आणि या वादाची दखल मुख्यमंत्र्यांना का घ्यावी लागलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
navi mumbai politics
navi mumbai newsSaam tv
Published On

नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदेगटात वाद पेटलेला असतांना आता नवी मुंबईतल्या भाजपमध्ये अंतर्गत वादही टोकाला गेलाय. भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातला वाद थेट वर्षा दरबारी पोहचलाय. त्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्री या वादावर काय तोडगा काढणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असतांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचलेल्या भाजप आमदार मंदा म्हात्रे काय म्हणाल्या पाहा.

गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला वाद सर्वश्रूत आहे. पण 15 जूनला झालेल्या घडलेल्या घटनेनं मात्र या वादाची चर्चा राज्यभरात सुरु झाली. असं नेमकं काय घडलं पाहा...

नवी मुंबईत आरोग्य सेवांच्या कार्यक्रमात दोघांमध्ये श्रेयवाद

नाईकांनी कार्यक्रम पत्रिकेत नावं बदलल्याचा म्हात्रेंचा आरोप

आपल्या मतदार संघात नाईक कामं करत असल्याचा दावा

भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी कार्यक्रमावर टाकला बहिष्कार

कार्यकर्त्यांनी धक्का बुक्की केल्याचा मंदा म्हात्रेंचा आरोप

गणेश नाईकांमध्ये अंहकार असल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी मध्ये असल्यापासून त्रास दिल्याचा दावा भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी केलाय. घडलेल्या सर्व प्रकाराची मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचं देखील मंदा म्हात्रे म्हणाल्या...मात्र यावर सोमवारी मंत्री गणेश नाईकांनी देखील उत्तर दिलंय.

navi mumbai politics
सर्वात मोठी बातमी! १०० नगरसेवकांचा राजीनामा; राज्यातील राजकारणात खळबळ,TMCमध्ये अंतर्गत वाद उफाळला

मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरुये. गणेश नाईकांमुळेच राष्ट्रवादी सोडत मंदा म्हात्रे भाजपमध्ये आल्या पण पाठोपाठ गणेश नाईक देखील भाजपवासी झाले. त्यामुळे दोघांची वादानं पाठ सोडलेली नाही. उलट दोघांमधला भांडणं वाढतच गेली. त्यामुळे दोघे राष्ट्रवादीत असताना जो वाद खुद्द शरद पवार सोडवू शकले नाही तो वाद आता देवेंद्र फडणवीस सोडवणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com