Drunk Driver  Rams Multiple Vehicles
Drunk Driver Rams Multiple Vehicles

Mumbai Accident: कारवर पोलिसाची नेमप्लेट, चालक दारुच्या नशेत बेभान; भरधाव वेगात वाहनांना धडाधड उडवलं!

Drunk Driver Rams Multiple Vehicles: नवी मुंबईतील करावे गावाजवळ एका मद्यधुंद इनोव्हा चालकाने अनेक वाहनांना धडक दिली. गाडीत पोलिसांच्या नावाची पाटी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच ओळखपत्र सापडले आहे.
Published on
Summary
  • नवी मुंबईतील करावे गावाजवळ मद्यधुंद चालकाचा भीषण अपघात

  • भरधाव इनोव्हा कारने अनेक उभ्या व चालू वाहनांना धडक

  • कारवर ‘पोलीस’ नेमप्लेट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ओळखपत्र आढळले

विकास मिरगणे, साम प्रतिनिधी

नवी मुंबईतील करावे गावाजवळ एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित इनोव्हा कारने रस्त्यावर उभ्या आणि चालू असलेल्या काही वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघात करणाऱ्या इनोव्हा कारवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट असल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालक नशेत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यानंतर कारनं अनेक वाहनांना उडवलं.

अपघातानंतर कारची तपासणी केली असता, त्यामध्ये मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र सापडले. या प्रकारामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.

भरधाव कारनं ३ दुचाकींना उडवलं; दोन जण जागीच ठार

कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कारने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. धडकेनंतर दुचाकीस्वार दूरवर फेकले गेले तर अपघातग्रस्त क्रेटा कार घटनास्थळीच उलटी झाली.

Drunk Driver  Rams Multiple Vehicles
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर तब्बल ९ दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या कुठे आणि कधी असणार रस्ता बंद?

या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सायबर चौकातून शाहू मिल चौकाच्या दिशेने येताना कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. गंभीर जखमीवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com