मनोज तांबे, साम टीव्ही
नालासोपारा: नालासोपारा पूर्व परिसरात एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींकडून निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या व्हिडीओमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. नालासोपारा पूर्व येथील शांती लाईफ इमारतीमध्ये स्वप्नाली सिंग या आपल्या पती आणि लहान मुलीसह राहतात. स्वप्नाली या पेशाने शिक्षिका असून त्या घरातच मुलांच्या शिकवण्या घेतात. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १३ वर्षांपासून सासरच्यांकडून त्यांचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात आहे.
व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सासरचे मंडळी स्वप्नाली यांना कशाप्रकारे अमानुषपणे मारहाण करत आहेत, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. सासू, सासरे, दोन नणंद, दीर आणि नणंदेचे पती अशा सर्वांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप स्वप्नाली यांनी केला आहे. वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत असूनही सासरच्यांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
गेल्या १३ वर्षांपासून सासरचे लोक हुंड्याच्या पैशांसाठी मला त्रास देत आहेत. हा छळ आता असह्य झाला आहे, असे स्वप्नाली सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.