Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Municipal Election: नगरपरिषदेनंतर राज्याचं लक्ष लागलंय ते मुंबई क्षेत्रातील 9 महापालिकांकडे. कारण याच महापालिका राजकीय पक्षांसाठी किंगमेकर ठरणार आहेत. त्या नेमकं कसं. आणि ज्याचा महापालिकांवर कब्जा त्याचा मंत्रालयावर कसा झेंडा लागू शकतो ? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Mumbai Municipal Corporation Election
Political battle intensifies as Maharashtra’s 9 key municipal corporations emerge as the real power centers ahead of major state-level decisions. saam tv
Published On

राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलंय. 29 पैकी मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या ९ महापालिकांच महत्व गेल्या काही वर्षाच वाढलय..ते ही इतकं की ज्यांचा या महापालिकांवर कब्जा त्यांचा मंत्रालयावर झेंडा..साहजिकच या पालिकांवर ताब्यात घेण्यासाठी आणि सत्तेचा रिमोट आपल्याच हाती ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. का एवढ्या महत्वाच्या आहेत या महापालिका पाहूयात.

MMR मधील 9 महापालिकांच्या क्षेत्रात विधानसभेच्या 75 जागा

9 महापालिकांमधील आर्थिक आणि राजकीय ताकद सत्ताधाऱ्यांसाठी आव्हानात्मक

MMR मधील महापालिकांचं एकूण बजेट 1 लाख 1 हजार कोटींचं

आर्थिक आणि राजकीय शक्तीस्थान असल्यानं MMR मध्ये मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद

मुंबई महापालिकेचं 74 हजार 427 कोटींचं बजेट आहे तर 81 हजार कोटींच्या ठेवी आहेत.. नवी मुंबई महापालिकेचं 5,709 कोटीचं बजेट तर 5,500 कोटींचं फिक्स डिपॉझिट आहे....ठाणे महापालिकेत 6,550 कोटींचं बजेट आहे. तर कल्याण डोंबिवलीचा 3,361 कोटींचा अर्थसंकल्प आहे. तर मिरा भाईंदर महापालिकेचं 2,694 कोटींचं बजेट आहे. वसई विरार महापालिकेत 3,926 कोटीचा अर्थसंकल्प आहे. तर उल्हासनगर महापालिकेचं 1,111 कोटीचं बजेट आहे... दुसरीकडे भिवंडी निजामपूर महापालिकेचा 1,097 कोटींचं बजेट आहे. तर पनवेल महापालिकेचं 2,500 कोटींचं बजेट आणि 600 कोटींच्या ठेवी आहेत.

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर गावखेड्यात सहकाराच्या माध्यमातून कारखानदारी रुजवली. हाच सहकार आणि कारखानदारी सत्ताकेंद्र बनली.. या सत्ताकेंद्रावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं कायम वर्चस्व राहिलंय. मात्र आता सत्तेचं केंद्र मुंबई महानगराकडे वळण्याची शक्यता आहे. आणि त्याचं कारण आहे एमएमआर परिसरातील महापालिकांच्या तिजोऱ्या.

मुंबई महापालिकेचं 74 हजार 427 कोटींचं बजेट आहे तर 81 हजार कोटींच्या ठेवी आहेत. नवी मुंबई महापालिकेचं 5,709 कोटीचं बजेट तर 5,500 कोटींचं फिक्स डिपॉझिट आहे. ठाणे महापालिकेत 6,550 कोटींचं बजेट आहे. तर कल्याण डोंबिवलीचा 3,361 कोटींचा अर्थसंकल्प आहे. तर मिरा भाईंदर महापालिकेचं 2,694 कोटींचं बजेट आहे. वसई विरार महापालिकेत 3,926 कोटीचा अर्थसंकल्प आहे. तर उल्हासनगर महापालिकेचं 1,111 कोटीचं बजेट आहे. दुसरीकडे भिवंडी निजामपूर महापालिकेचा 1,097 कोटींचं बजेट आहे. तर पनवेल महापालिकेचं 2,500 कोटींचं बजेट आणि 600 कोटींच्या ठेवी आहेत.

1 लाख कोटींचं वार्षिक बजेट असलेल्या या महापालिकांच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती ठेवण्यासाठी महायुतीसह ठाकरे बंधू आणि काँग्रेसनंही जोर लावलाय. याआधी झालेल्या निवडणुकीत 9 पैकी 3 महापालिकांवर शिवसेना, 4 महापालिकांवर भाजप तर राष्ट्रवादी आणि हितेंद्र ठाकूर यांची प्रत्येकी 1 महापालिकेवर सत्ता होती. तर राज्यातील 4 पैकी 1 विधानसभा मतदारसंघ या 9 महापालिका क्षेत्रात येतो. त्यामुळे इथला विजेता राज्याचा 'किंगमेकर' ठऱणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com