इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडलेला कुत्रा ३ वर्षांच्या मुलीच्या अंगावर पडला. या घटनेमध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला. मुंब्र्यामध्ये ही धक्कदायक घटना घडली आहे. ही थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे मुंब्र्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील अमृत नगर येथे ही घटना घडली. चिराग मेसन नावाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या जैद सय्यद यांनी कुत्रा पाळला होता. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जैद यांचा कुत्रा पाचव्या मजल्यावरून खाली पडला. यावेळी रस्त्यावरून आपल्या आईसोबत जाणाऱ्या ३ वर्षीय चिमुकलीच्या अंगावर हा कुत्रा पडला. कुत्रा पडल्यानंतर मुलीच्या आईने तिला तात्काळ रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या घटनेमध्ये कुत्रा देखील जखमी झाला आहे.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक चिमुकली आपल्या आईसोबत रस्त्यावरून चालली आहे. मुलगी आईच्या पुढे दिसत आहे. अशातच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून कुत्रा अतिशय वेगाने खाली येऊन मुलीच्या अंगावर पडतो. चिमुकली बेशुद्ध झाली. तिच्या आईने तिला तात्काळ उचलले आणि रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर घटनास्थळावर राडा झाला.
या घटनेमध्ये कुत्रा देखील जखमी झाला. जखमी कुत्रा रस्त्यावर त्याच ठिकाणी पडून होता. या घटनेची माहिती प्राणीप्रेमी मुजना यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जमी झालेल्या कुत्र्याला त्यांनी खारघर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेते. घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.