Palghar News: धक्कादायक! आश्रम शाळेतील २५० विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Palghar 25 Girls Students Poisoned: पालघरमधील एका आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५० विद्यार्थिनींना विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Palghar News: आश्रम शाळेतील २७ विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू
Palghar 25 Girls Students PoisonedSaam Tv
Published On

रूपेश पाटील, पालघर

राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये किडे, मुंग्या, आळ्या, झुरळ, बेडूक आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातल्या आंबेगावमधील एका आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधामध्ये आळ्या आढळल्या होत्या. अशातच आता पालघरमधील एका आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५० विद्यार्थिनींना विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रम शाळेतील २५० विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या २५० विद्यार्थिनींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहाटे पाच वाजताच्या सुमारास उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने या विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जेवणातून आणि पाण्यातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली या विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Palghar News: आश्रम शाळेतील २७ विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai Crime News: दादर रेल्वे स्थानकात बॅगमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा प्लॅन फसला

दरम्यान, धाराशिवमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडूक आढल्याची घटना समोर आली होती. तर घाटकोपच्या केव्हीके शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामध्ये झुरळ आढळले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच, शाळा आणि सरकारला धारेवर धरले.

Palghar News: आश्रम शाळेतील २७ विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू
Dadar Railway Station: दादर स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, चंद्रशेखर आझाद यांची संसदेत मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com