

Maharashtra CM defends Mumbai infrastructure growth : मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, मुंबईचे प्रश्न अडचणी समजण्यासाठी मुंबईत जन्माला यावे लागते, असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. तुम्ही इतके वर्षे मुंबईतील मराठी माणसासाठी काय केले? याचा उत्तर द्यावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न केला. मुंबईच्या विकासाची सुरूवात नागपूरकर गडकरींमुळेच झाली. आम्ही मुंबईत जन्माला आलो नाही, हा आमचा दोष नाही, असे फडणवीस म्हणाले. ते साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट या कार्यक्रमात बोलत होते. संपादक निलेश खरेंच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली. वाचा
हे फक्त फ्रस्ट्रेशन आणि फक्त निराशा आहे. देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जन्माला यायचं. गुजरातमध्ये जन्मनेल्या मोदींना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश माहितेय. त्यांच्या इतका देश कुणालाच माहिती नाही. समजा मुंबई मला कळत नाही, तुम्हाला कळते. पण इतक्या वर्षे तुम्ही काय केले. मुंबईतील मराठी माणसाला मुंबई सोडून दूर घर घ्यावे लागले. २५ वर्षे मुंबईत सत्ता होती, तुम्ही काय केले.. नागपूरच्या गडकरींनी मुंबईमध्ये ५५ उड्डाणपूल बांधले, वरळी-वांद्रे सी लिंक बांधला अन् मुंबईच्या विकासाला सुरूवात झाली. त्यानंतर माझ्या सरकारमध्ये, शिंदे अन् पुन्हा माझ्या काळात मुंबईचा विकासाला सुरूवात झाली. मुंबईत जन्मलेल्यांनी पहिल्यांदा तुम्ही सत्तेत असताना काय केले, त्याचं उत्तर द्यावे, असा सवाल फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस आणि इथके अनेक नेते मुंबईतील नाही, बाहेरचे आहेत, त्यांना येथील प्रॉब्लेम समजणार कसे? मुंबईचे प्लॉल्बेम प्रश्न समजून घ्यायला मुंबईतच जन्म घ्यावा लागतो, असा घणाघात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केला होता.
पुण्यातील मुंबईतील मेट्रो प्रकल्प मनमोहन सिंह यांच्या काळात मंजूर झाल्याचे अजित पवार म्हणाले. त्यावर निलेश खरेंनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आमच्यासोबत आहेत, त्यांच्याकडे दाखवण्यासारखे खूप आहेत. आमच्याविरोधात लढतात त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे आरोप करावे लागतात. मनमोहन सिंह यांनी मेट्रो दिली होती तर सुरू का झाली नाही? सत्ता कुणाच्या हातात होती. देवेंद्र फणवीस यांची वाट का पाहावी लागली. त्या मेट्रोसाठी नागपूर मेट्रो कंपनीला महामेट्रोचे नाव देऊन काम करावे लागले. आमच्या विरोधात लढताता त्यांचा एकच प्रयत्न आहे, तीव्र अन् टोकाचं बोलायचं. विकासावरील फोकस दुसरीकडे जाईल, असे सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले. अजित पवार आमचे मित्र आहेत, पण पुण्यात आमचे विरोधक म्हणून उतरले आहेत. शरद पवार यांनी किती वर्षे चालवले, त्याचे शिलेदार अजित पवार होते, हा प्रश्न पुणेकर विचारतील. हा प्रश्न शरद पवारांकडे जाईल, त्यावेळी अजित पवारांना उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे हे ठरवून बोलले जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.