

Mumbai Traffic Police Latest News : मुंबईत वाहतुकीचे नियम मोडून सर्रास 'रॉन्ग साईड'ने (चुकीच्या दिशेने) गाड्या चालवणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी आता अत्यंत कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. चालू वर्षातील ११ महिन्यांत चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या तब्बल ३८ हजारांहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बेशिस्तपणामुळे मुंबईतील अपघातांचा धोका वाढल्याने पोलीस प्रशासनाने हा कठोर पवित्रा घेतला आहे.
अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. हेल्मेट न घालता दुचाकी चालवतात. रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवतात. यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळेच अशा बेशिस्त चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
मुंबईतील सर्व ४१ वाहतूक विभागांना रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २०२६ नोव्हेंबरपर्यंत ११ महिन्यांत रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवताना आढळलेल्या चालकांना ३८,००० हून अधिक चलान बजावण्यात आली आहेत.
बाईक आणि स्कूटरसारखी दुचाकी वाहने रस्त्याच्या चुकीच्या बाजूने चालवण्यात सर्वाधिक आढळतात. चुकीच्या बाजूने वाहन चालवणे हे केवळ चालकासाठीच नव्हे, तर रस्त्यावरील इतर वाहनांसाठीही धोकादायक ठरू शकते. यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना केवळ स्वतःच्याच सुरक्षिततेसाठी नव्हे, तर इतरांच्या सुरक्षिततेचाही विचार करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, कारण तुमची एक चूक अपघाताला कारणीभूत ठरू शकते.
आता चालनासोबत एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्यांना केवळ चालानच बजावण्यात आले नाहीत. तर गंभीर प्रकरणांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान १५०० हून अधिक एफआयआर देखील नोंदवण्यात आले आहेत. वाहतूक सहआयुक्तांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवताना आढळलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी आरटीओकडे पाठवण्यात आले आहेत.
राँग साइडने वाहन चालवल्याबद्दल ३०० हून अधिक लोकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ही आकडेवारी ऑगस्टच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंतची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.