विजय पाटील, सांगली प्रतिनिधी
Mahendra Lad elected Sangli District Bank chairman : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या असून, काँग्रेसचे महेंद्र लाड यांची अध्यक्षपदी, तर शिंदे सेनेचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. (Vishwajeet Kadam and Suhas Babar Factions Secure Key Posts in Sangli District Bank, Mahendra Lad and Tanaji Patil Elected Unopposed)
नूतन अध्यक्ष महेंद्र लाड हे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या गटाचे मानले जातात, तर उपाध्यक्ष तानाजी पाटील हे शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या गटाचे आहेत. या निवडणुकीमुळे सांगली जिल्हा बँकेत काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदे सेना आणि भाजपा अशी सर्वपक्षीय सत्ता प्रस्थापित झाली आहे. पण निवडीच्या वेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
(बातमी अपडेट होत आहे)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.