Mumbai Water Issue: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, आता पाणी कपातीचं टेन्शन दूर होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Mumbai Water Shortage: राज्य सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने धरणांमधील राखीव साठ्यातील १५० दशलक्ष लीटर पाणी मुंबईला देण्याचे मान्य केले आहे.
Mumbai Water Supply News Today
Mumbai Water Supply News TodaySaam TV
Published On: 

Mumbai Water Supply News Today: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने येत्या काही दिवसांत मुंबईकरांवर १० ते १५ टक्के पाणी कपातीचे संकट असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. (Latest Marathi News)

मात्र, आता राज्य सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने धरणांमधील राखीव साठ्यातील १५० दशलक्ष लीटर पाणी मुंबईला देण्याचे मान्य केले आहे. राखीव साठ्यामुळे मुंबईत आणखी एक ते दीड महिना म्हणजे जुलै अखेरपर्यंत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

Mumbai Water Supply News Today
Maharashtra Monsoon Update: अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा मान्सूनला फटका; पावसाचे आगमन पुन्हा लांबणीवर!

प्राथामिक माहितीनुसार, मुंबईला (Mumbai) दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांमधून केला जातो.

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ५ जून रोजी सातही धरणांत ११.५८ टक्के म्हणजे १ लाख ६७ हजार ५४९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

यंदा मान्सून (Monsoon Update) उशीरा दाखल होणार असल्याने पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईला अतिरिक्त पाण्याची गरज भासू शकते. यासाठी राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा धरणातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर अतिरिक्त राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिकेने सरकारकडे केली होती.

Mumbai Water Supply News Today
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; दुसऱ्या टप्प्यात इतक्या मंत्र्यांचा शपथविधी होणार!

याबाबत मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी आयुक्तांनी राज्य शासनाने आपला अतिरिक्त पाणी साठा पालिकेला देण्याचे मान्य केल्याची माहिती शेलार यांनी दिली आहे. त्याचबरोबर शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे याबाबत आभार मानले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने पालिकेला राखीव कोट्यातील पाणी देण्याचे मान्य केल्याने पाणीकपात टळणार की पुढील काही दिवसांची तरतूद म्हणून प्रशासन पाणीकपात करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जल विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तूर्तास कपात केली जाणार नाही. याबाबत जून अखेरीस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com