Mumbai Shocking : तरुणी ३ महिन्यांपासून बेपत्ता; पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड, कुटुंबीयांची पायाखालची जमीनच सरकली

Mumbai Shocking news : विक्रोळीतील तरुणी गेल्या ३ महिन्यांपासून बेपत्ता होती. याच तरुणीबाबत पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड झालं.
Mumbai News
Mumbai Shocking news Saam tv
Published On
Summary

विक्रोळीतील तरुणी सराटे तीन महिन्यांपासून बेपत्ता होती.

तिच्या बहिणीला अचानक मनिषाबाबत हादरवणारी माहिती मिळाली.

पोलिसांनी तांत्रिक तपासातून घेतला तरुणी जिवंत असल्याचा शोध

पोलिसांनी तरुणीला दिलं कुटुंबाच्या ताब्यात

मयूर राणे, साम टीव्ही

तरुणी गेल्या तीन महिन्यापासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही तरुणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. तरीही कुंटुबातील सदस्यांचा शोध सुरु होता. दोन दिवसांपूर्वी कुटुंबीयाच्या सदस्याच्या व्हॉट्सअॅपवर तरुणी मृत झाल्याची माहिती आली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलीस तपासात तरुणीबाबात धक्कादायक सत्य उघड झालं. त्यामुळे कुटुंबीयांची पायाखालची जमीनच सरकली.

Mumbai News
SC आरक्षणात होणार मोठा बदल; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी हिंट

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी कन्नमवारनगर या ठिकाणी राहणारी मनिषा सराटे नावाची महिला गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होती. दोन दिवसांपूर्वी म्हणजे २४ सप्टेंबर रोजी मनिषा मृत झाल्याचा फोटो हा तिची बहीण उषा खंदारे यांच्या व्हॉट्सअॅपवर आला. त्यानंतर मनिषाच्या कुटुंबाने विक्रोळी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.त

Mumbai News
Marathwada Floods : मंत्र्यांचे दौरे की पूर पर्यटन? शेतकऱ्यांना मदतीची आस, प्रत्यक्षात मदत कधी मिळणार?

तक्रार दाखल झाल्यानंतर विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष कोळी आणि त्यांच्या टीमने संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी आधुनिक आणि तांत्रिक कार्यपद्धतींचा वापर करून मनिषा जिवंत असल्याची माहिती मिळाली.

Mumbai News
Ajit Pawar News : अजित पवारांची आगामी निवडणुकीसाठी गेमचेंजर खेळी; शरद पवार अन् भाजपचे २ बडे नेते फोडले

मनिषा ही एका तरुणासोबत ठाणे जिल्ह्यातील कळवा या परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना कळवा परिसरातून ताब्यात घेतले. पुढे पोलिसांनी अधिक चौकशी करून मनीषाला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mumbai News
Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com