SC आरक्षणात होणार मोठा बदल; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी हिंट

Shedule caste Reservation : अनुसूचित जातींच्या आरक्षणात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
Devendra fadnavis
Shedule caste Reservation Saam tv
Published On
Summary

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरणाचे संकेत

सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार क्रीमी लेयर फॉर्म्युला SC वर्गात लागू करण्याचा विचार

उपवर्गीकरणासाठी विशेष समिती गठीत

अंतिम अहवाल लवकरच सादर होणार

एकीकडे मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. तर बंजारा समाज हा आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी करत आहे. राज्यात आरक्षणावरून वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणावर मोठं भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जातीत उपवर्गीकरण लागू करण्याविषयी मोठे संकेत दिले आहेत.

Devendra fadnavis
Marathwada Flood : मायबाप सरकार तुम्हीच सांगा कसं जगायचं? शेतकऱ्याचा आर्त सवाल

'आज तक'च्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडेशी बोलताना म्हटलं की, 'ओबीसी आरक्षणात क्रीमी लेयरची अट आहे. ओबीसी वर्गात एखाद्याचं उत्तन्न ठराविक रक्कमेहून अधिक असेल, तर त्या व्यक्तीस आरक्षणाचा लाभ मिळत नाही. ओबीसी आरक्षणाचा लाभ नॉन-क्रीमी लेयर असलेल्या वर्गाला मिळू शकतो. सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेयर आणि नॉन-क्रीमी लेयरची व्याख्या स्पष्ट केली आहे.

Devendra fadnavis
Thane Municipal Corporation : महायुतीत रंगणार संघर्ष, ठाण्याचा गड कोण राखणार? ठाकरे बंधूंची जादू चालणार का?

फडणवीसांनी म्हटलं की, 'काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीत क्रीमी लेयर फॉर्म्युला लागू करण्याविषयी भाष्य केलं आहे. अनुसूचित जातींचाही प्रत्येक राज्यात प्रभाव आहे. त्यातील जाती आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाविषयी भाष्य केलं आहे. कारण या वर्गातील काही जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाहीये'.

Devendra fadnavis
Nandurbar Adivasi Morcha : नंदूरबार का पेटलं? आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; १४० हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितलं की, 'येत्या एक-दोन महिन्यात अनुसूचित जातींत उपवर्गीकरण लागू केलं जाईल. अनुसूचित जातींत उपवर्गीकरणासाठी एका कमिटी गठीत करण्यात आली आहे. हायकोर्टाचे माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी आरक्षणाच्या वर्गीकरणावर काम करत आहे. या कमिटीचा अंतिम अहवाल शेवटच्या टप्प्यात आहे. अहवाल सादर होताच उपवर्गीकरण लागू केलं जाईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com