
ऐकलतं.. हे आहेत राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन.. भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे या पुरग्रस्त गावात महाजनांनी दौरा केला.. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी महाजनांचा ताफा अडवून धरला.. आणि आमची जनावरं वाहून गेलेत, आम्हाला तात्काळ मदत द्या, अशी आक्रमक मागणी केली.. मात्र महाजनांनी यावेळी थेट शेतकऱ्यांनाच सुनावलं.. मी काय लगेच पैसे मोजून देणार आहे का?, असा उलटा सवालच महाजनांनी केला...
परंड्यात थेट मदतीचं कीट घेऊन गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार तानाजी सावंत यांनाही संसार उध्द्वस्त झालेल्या महिलांच्या रोषाला सामोर जावं लागलं..उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालून कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीच त्यांनी केली... मात्र त्याला उत्तर म्हणून, आता दोन वेळचं जेवण, कपडे देणं महत्त्वाचं आहे, असं म्हणत आमदार सावंतानी मागणी धुडकावून लावली.
जालना - बीड जिल्हयाचा दौरा करून धोंडराई आणि हिरापूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडें..त्यांनी तर दौऱ्यादरम्यान एका गावात बाजावर बसून थेट पीडित गावकऱ्यांसमोरच जेवण केलं.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रत्येत मंत्र्याला आणि पालकमंत्र्याला आपापल्या जिल्ह्यात जाण्याचे आदेश दिलेत.पण अशा या दौऱ्यातून नेमकं काय निष्पन्न होत हा वादाचा मुद्दा आहे.. त्यामुळे विरोधकांनी ही या दौऱ्यांवर टीका केली आहे.
दरम्यान मंत्री आणि आमदारांच्या या पूरग्रस्त भागातील दौऱ्यादरम्यानच्या असंवेदनशील कृतीमुळे लोकप्रतिनिधी नेमकं शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालायला गेले होते की मीठ चोळायला असा सवाल निर्माण झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.