Versova-Madh Bridge: २२ किमीचं अंतर फक्त ५ मिनिटात, वर्सोवा-मढदरम्यान तयार होणार केबल ब्रिज

Versova-Madh Cable Bridge : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईला आणखी एक नवीन ब्रिज मिळणार आहे. वर्सेवा ते मढ असा केबल ब्रिज होणार आहे.
Versova-Madh Bridge
Versova-Madh BridgeSaam Tv
Published On
Summary
  • मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार

  • वर्सोवा ते मढ असा पूल होणार तयार

  • ९० मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत होणार

मुंबईकर नेहमीच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असतात. आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांचा प्रवास अजून सुखकर आणि जलद होणार आहे. आता नवीन पुल मुंबईकरांसाठी सुरु होणार आहे. या नवीन पुलामुळे ९० मिनिटांचा प्रवास अवघ्या ५ मिनिटांत होणार आहे. मढ ते वर्सोवा असा केबल पूल बांधण्यात येणार आहे. (Versova Madh Bridge)

Versova-Madh Bridge
Versova-Dahisar Coastal Road: नदी-खाडीच्या खालून जाणार भूयारी मार्ग, खर्च किती अन् वेळ किती वाचणार?

दोन समुद्रकिनाऱ्यांना जोडला जाणारा पूल (Versova Madh Bridge)

पश्चिम उपनगरातील मढ आणि वर्सोवा या दोन समुद्रकिनाऱ्यांना जोडणाऱ्या पुलाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच उच्च न्यायालयातून परवानगी येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

मुंबई महापालिकतर्फे वर्सोवा ते मढ या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, आता हे काम प्रत्यक्ष सुरु होणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या पुलाच्या कामाचा हिरवा कंदिल दिला ाहे.

वर्सोवा पूला हा वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला थेट अंधेरीवरुन मढ गाठता येणार आहे. यामुळे तुम्ही अवघ्या काही मिनिटात मढला पोहचणार आहे. या पुलामुळे अंधेरीतून थेट मढ आणि मढ येथून सागरी किनारी मार्गावर जाता येईल.

Versova-Madh Bridge
Amrut Bharat Station: वडाळा, माटुंगा स्टेशनचा कायापालट; पंतप्रधान मोदी आज उद्घाटन करणार

मुंबई- ठाण्याला जोडणारा अजून एक जोडरस्ता

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मढ-वर्सोवा या दोन समुद्रकिनाऱ्यावर पुल बांधण्यात येणार आहे. पा पूल मुंबई महापालिकेच्या वर्सोवा-दहिसर-भाईंदर या किनारी मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबई ठाण्याला जोडणारा आणखी एक रस्ता तयार होणार आहे.

खर्च

या पूलासाठी अंदाजे २१०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या पुलामुळे २२ किलोमीटरचे अंतर अवघ्या १.५ किलोमीटरवर येणार आहे. या पूलाचे काम मार्गी लागण्याचा सर्व मार्ग आता मोकळे झाले आहेत.

Versova-Madh Bridge
Vande Bharat news: अरे वा! प्रवासाच्या १५ मिनिटे आधीच बुक करू शकता वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Q

वर्सोवा-मढ पूल काय आहे?

A


हा पूल पश्चिम मुंबईतील वर्सोवा आणि मढ या समुद्रकिनाऱ्यांना जोडणारा एक समुद्री पूल आहे.

Q

या पूलामुळे काय फायदा होणार?

A

९० मिनिटांचा प्रवास केवळ ५ मिनिटांमध्ये होणार आहे.

Q

या प्रकल्पाचा खर्च किती?

A

या पुलाच्या कामासाठी सुमारे २१०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Q

या पूलाचा उपयोग कोणाला होणार आहे?

A

हा पूल वर्सोवा-दहिसर-भाईंदर सागरी मार्गाशी जोडला जाईल, ज्यामुळे मुंबई आणि ठाण्यादरम्यान एक नवीन रस्ता तयार होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com