Mumbai Traffic: गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीत मोठा बदल; अशी असणार मुंबई-पुण्याची वाहतूक व्यवस्था

Mumbai Traffic Changes Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील वाहतूक नियमात अनेक बदल करण्यात आलेत. मुंबईतील २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत कोणते रस्ते बंद असणार, कुठे गाडी पार्किंग करता येणार नाही, याची माहिती जाणून घेऊ.
Mumbai Traffic
Mumbai police announce major traffic changes during Ganeshotsav to manage heavy crowds on Mumbai-Pune routes.saam tv
Published On
Summary
  • गणेशोत्सव काळात मुंबईत २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान वाहतूक नियमात बदल होणार आहेत.

  • मोठ्या संख्येने नागरिक बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्यावर उतरणार असल्याने कोंडीची शक्यता आहे.

  • मुंबई-पुणे महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बदल लागू राहतील.

  • वाहतूक विभागाने गर्दी आणि अपघात टाळण्यासाठी विशेष योजना आखली आहे.

गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील वाहतूक नियमात अनेक बदल करण्यात आले आहेत. बुधवार 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव चालू असणार आहे. मोठ्या संख्येने लोक गणेश मंडळातील बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडत असतात. अशात मुंबई आणि पुणे शहरात वाहूतक कोंडी होत असते. यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहतूक विभागाने वाहतुकीमध्ये बदल केले आहेत.

मुंबईतील अनेक रस्ते गाड्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. तर काही रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहे. मुंबईत २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या काळात अपेक्षित गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केलेत.

जुन्या आणि धोकादायक रेल्वे उड्डाणपुलांबाबत बीएमसीने कडक सुरक्षा नियम लागू केलेत. पुलावर एका वेळी १०० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसणार आहे. पुलांवर थांबणे, नाचणे किंवा डीजे/लाऊडस्पीकर वापरण्यास सक्त मनाई असणार आहे. विसर्जनाच्या दिवशी गिरगाव, लालबाग, दादर-शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, मालाड-मार्वे आणि बोरिवली जेट्टी परिसरात वाहतूक कोंडी होऊ शकते.

Mumbai Traffic
Mumbai Ganeshotsav : मुंबई गणेशोत्सव मंडळांना महापालिकेचा मोठा झटका, खड्डा खोदल्यास १५ हजार रुपये दंड | VIDEO

'या' मार्गामध्ये करण्यात आलाय बदल

गणेशोत्सव काळात दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनांना छत्रपती संभाजी राजे कोस्टल रोडने प्रवास करावा लागेल.

ईस्टर्न फ्रीवे (विलासराव देशमुख फ्रीवे) आणि अटल सेतू वरून प्रवास करणाऱ्या वाहनांना सीएसएमटी, भाटिया बाग, मेट्रो जंक्शन आणि प्रिन्सेस स्ट्रीट मार्गे पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणूक आणि विसर्जन कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी कुलाबा, मरीन ड्राइव्ह, काळबादेवी, गिरगाव, दादर, शिवाजी पार्क, लालबाग, परळ, भायखळा आणि बोरिवली येथील अनेक प्रमुख रस्ते बंद किंवा त्या रस्त्यावरील वाहतूक वळवले जाणार आहे.

Mumbai Traffic
Ganesh Chaturthi 2025 : तुमच्या राशीनुसार गणपती बाप्पाला कोणता प्रसाद द्याल? जाणून घ्या खास संबंध

पार्किंग आणि वाहनांसाठी बंदी

विसर्जनाच्या दिवशी कुलाबा, मरीन ड्राइव्ह, दादर, माहीम, चेंबूर, जुहू, मालाड, कांदिवली आणि बोरिवली येथील प्रमुख रस्त्यांवर 'नो पार्किंग' झोन लागू केले जाणार आहेत.

दक्षिण मुंबईत सकाळी ७ ते मध्यरात्रीपर्यंत जड वाहने आणि खासगी बसेसला प्रवेश बंदी असेल. उपनगरांमध्ये सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे.

मुख्य विसर्जनाच्या दिवशी हे निर्बंध 24 तास लागू असणार आहे.

Mumbai Traffic
Home Price Hike: मुंबई-पुण्यात घराचं स्वप्न महागणार! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, घराची किंमत का वाढतेय?

पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल

पुणे शहरातील वाहतुकीसुद्धा मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक भागातील मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आलाय.

शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा चौक ते गोतीराम भैय्या चौक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.

फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज तसेच आप्‍पा बळवंत चौक ते बुधवार चौक, मोती चौक त्याचबरोबर मंगला टॉकीज समोरील रस्ता या ठिकाणी जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलीय.

पीएमपी बससाठी सुद्धा पर्यायी मार्ग तयार कार्यात आले आहेत.

शिवाजीनगर बसस्‍थानकावरून शिवाजीरस्‍त्‍याने स्‍वारगेटला जाणाऱ्या बस या स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्‍ता व टिळक रस्‍त्‍याने स्‍वारगेटला जातील.

मनपा बसस्‍थानकावरून स्‍वारगेटला जाणाऱ्या बस या जंगली महाराज रस्‍ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्‍ता, शास्‍त्री रस्‍त्याने स्‍वारगेटला जातील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com